21 C
New York

Varsha Gaikwad : उत्तर मध्य मुंबईमधून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी

Published:

मुंबई

मुंबई उत्तर मध्य (Mumbai North Central) लोकसभा मतदारसंघाचा महाविकास आघाडीचा उमेदवारीचा प्रश्न मिटला आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना उमेदवारी देण्यास आली आहे. मात्र, अद्याप मुंबई दक्षिण आणि उत्तर या दोन मतदारसंघांचा मात्र तिढा अद्याप सुटलेला नाही.
मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत सुरुवातीपासून नाराजीनाट्य सुरु आहे. सांगलीची जागा काँग्रेसला देऊन मुंबई उत्तर मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला द्यावा, यावर अनेक दिवस चर्चा सुरु होती. मात्र, ठाकरे गटाने सांगलीत काँग्रेसचे वर्चस्व असतानाही ही जागा आपल्याकडे घेतली. मुंबई उत्तर मतदारसंघात शिवसेनेचे अभिषेक घोशाळकर यांच्या मृत्यूमुळे असलेल्या शिवसेनेला सहानुभूती मिळू शकते, असा काँग्रेसचा युक्तिवाद होता. पण, या जागेचा प्रश्न अद्याप सुटला नाही.
वर्षा गायकवाड यांनी पारंपरिक दक्षिण मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेथून त्यांचे वडील एकनाथ गायकवाड यांनी निवडणूक जिंकलेली होती. शिवाय त्यांचा विधानसभा मतदारसंघही याच लोकसभा मतदारसंघात येतो. पण, शिवसेनेने या जागेवर आग्रह धरला. त्यामुळे वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबईतून निवडणूक लढवण्याचा पर्याय देण्यात आला असून त्याच्या नावाची घोषणा महाविकास आघाडीने केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img