23.1 C
New York

Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर संजय राऊतांचा हल्लाबोल, म्हणाले…

Published:

मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काँग्रेसबाबत केलेल्या एका वक्तव्यानं सध्या राजकारण ढवळून निघालेलं आहे. त्यावर जोरदार प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसतायेत. काँग्रेस (Congress) सत्तेत आली तर जनतेच्या संपत्तीची मोजणी करुन ती संपत्ती घुसखोर आणि मुसलमानांमध्ये वाटून टाकतील, असं नरेंद्र मोदी प्रचार सभांमधून सांगतायेत. इतकंच नाही तर महिलांची मंगळसूत्रंही काँग्रेसवाले नेतील, असा आरोप मोदीांकडून करण्यात येतोय. मोदींच्या या वक्तव्यांना काँग्रेस आणि इंडिया आघाडीतून (India Alliance) तितकंच जोरदार प्रत्युत्तर देण्यात येतंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर हल्लाबोल केला आहे.

पंतप्रधानांच्या या वक्तव्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार सचारा घेतला आहे. ज्यांना आपल्या घरातील मंगळसूत्राचा सन्मान ठेवता आला नाही, त्यांनी या विषयावर न बोललेलंच बरं, अशी खोचक टीका राऊत यांनी पंतप्रधानांवर केली आहे. तसंच मोदी सरकारच्या काळात अनेक घरांमधील महिलांना मंगळसूत्र गहाण टाकण्याची वेळ आली, अशी टीकाही त्यांनी केलीय. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटबंदीमुळं अनेक घरांत असे प्रकार घडल्याचं राऊत म्हणालेत.

या वक्तव्याचा प्रियांका गांधी यांनी जोरदार समाचार घेतला आहे. इंदिरा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्ययुद्धात मंगळसूत्र विकलं होतं, हे सांगतानाच त्यांनी भावनिक वक्तव्यही केलंय. त्यांची आई सोनिया गांधी यांनी मंगळसूत्र देशासाठी बलिदान केल्याचं प्रियांका म्हणाल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या वक्तव्याची निवडणूक आयोगानंही दखल घेतली आहे.

संजय राऊत म्हणाले की, अयोध्यात जेव्हा आंदोलन सुरु होत तेव्हा हे डरपोक कुठे होते, रामाच्या साहाय्याने हे निवडणुका जिंकायला बघत आहेत, त्यांची शेवटची फडफड सुरु आहे. देशात हे आंदोलन असतांना शिवसेना त्या आंदोलनात उतरली होती. अमित शहाच्या पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं होत कि हे कृत्य शिवसेनेने केलं होत तेव्हा बाळासाहेबांनी त्याची जवाबदारी घेतली होती, तेव्हा अमित शहा तरी होते का, असा टोला ही त्यांनी लगावला.

संजय राऊत म्हणाले की, साखर कारखान्यांना निवडणुकीच्या आधी दिलेला निधी म्हणजे लाच असल्याचा आरोप त्यांनी केला. साखर कारखान्यांना लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच कसा निधी देण्यात आला, यावर त्यांनी भाष्य केले. त्यांनी यावेळी निवडणूक आयोगाला पण कटघऱ्यात उभे केले. आता कुठे आहे निवडणूक आयोग, असा सवाल त्यांनी केला. 4 जूननंतर लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती येईल. त्यानंतर एकनाथ शिंदे गट पूर्णपणे संपलेला असेल, त्यांचा एकही खासदार निवडून येत नाही, अजित पवार आणि एकनाथ शिंदे संपलेले असतील, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img