23.1 C
New York

Sanjay Dina Patil : संजय दिना पाटलांचा भाजपवर हल्लाबोल, म्हणाले…

Published:

मुंबई

ईशान्य मुंबईत अनेक समस्य़ा असून गेल्या दहा वर्षात याकडे पुर्णता दुलर्क्ष करण्यात आले आहे. त्यामुळे लोकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून डंपिंगच्या जवळपास राहणा-या लोकांचे आयुष्यमान धोक्यात आले आहे. त्यांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा ही मिळत नाही. मग हे कसली गॅरेन्टी देत आहेत. सर्वच जुमला असून लोकांच्या हे चांगलेच लक्षात आले आहे. त्यामुळे लोकांना (Loksabha Election) आता बदल हवा आहे. ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) अधिकृत उमेदवार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांनी हे वक्तव्य केले. ते भांडुप येथे पत्रकारांशी बोलत होते.

त्यांनी यावेळी सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप केले. गेल्या दहा वर्षात डंपिंगचा प्रश्न त्यांना सोडविता आला नाही. डंपिंग परिसरात राहणा-या लोकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून त्यांना चांगल्या आरोग्य सुविधाही मिळत नाही. त्यामुळे त्यांचे आयुष्यमान कमी झाले असून उपचारासाठी त्यांना राजावाडी किंवा सायन रुग्णालयात जावे लागते. कारण ईशान्य मुंबईत सर्व सुविधांनी सुसज्ज असे एकही रुग्णालय नाही आहे. या भागात असलेली एसएमएस ही कंपनी लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असून ही कंपनी आम्ही बंद करु अशी माहिती संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना दिली.

संजय दिना पाटील म्हणाले की, कच-यांवर प्रक्रिया केली जात नाही. मोठ मोठे कॉम्पेक्स आले मात्र लोकांना पाहिजे त्या सुविधा दिल्या जात नाही. वाहतुक व्यवस्थेवर मोठा ताण असून उंच भागात पाणी पुरवठा योग्य प्रकारे होत नाही. असे असताना मुलुंड मध्ये धारावीकरांचे पुर्नवसन करण्याचा सत्ताधारी पक्षाचा डाव असून तो आम्ही उधळून लावू. धारावीकरांचे पुर्नवसन धारावीतच करण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी पत्रकारांच्या माध्यमातुन मुलुंडकरांना दिले.

लोकसभेच्या निवडणुकीत सर्व उमेदवार मोदींच्या नावावर मत मागत आहेत. किती दिवस मोदींच्या नावावर मत मागणार. स्वत: काही करणार आहे की नाही. ईशान्य भागात चांगले क्रिडा संकुल, रुग्णालय नसून ते होण्यासाठी मी केंद्रीय स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मी पैसे कमविण्यासाठी राजकारणात आलो नसून माझे आई वडील व घरातील सर्व सदस्य फार पुर्वीपासुनच समाजसेवा करीत आहेत. लोकांची सेवा करणे हेच आमचे व्रत आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेने भाजपाला मोठे केले असून आता मात्र त्यांना त्यांची जागा दाखवुन देऊ. असेही संजय दिना पाटील यांनी शेवटी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img