7.7 C
New York

Salman Khan : सलमान खान गोळीबार प्रकरणी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

Published:

रमेश औताडे/मुंबई

सलमान खान (Salman Khan) याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार (Firing) प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपींच्या
कोठडीत वाढ करण्यात आली.

सागर पाल आणि विकी गुप्ता या दोन आरोपींना गुरुवारी एक्सप्लेनेड कोर्ट क्रमांक 37 (किल्ला कोर्ट) येथील अतिरिक्त दंडाधिकारी जोशी यांच्या पुढे हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 29 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे विक्की गुप्ता आणि सागर पाल हे दोघेही नवी
मुंबईतील पनवेलमध्ये वास्तव्य करत होते. मागील एक महिन्यापासून त्यांनी पनवेलमध्ये भाड्यावर घर घेतले होते. या दोघांनी सलमान खानच्या घराची रेकी केली. रविवारी (14 एप्रिल 2024) या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला. यानंतर दोघेही घटनास्थळावरून पळून गेले. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपींचा शोध घेऊन विक्की गुप्ता आणि सागर पाल या दोघांना गुजरातच्या भुजमधून अटक केली.

अटकेनंतर त्यांना कोर्टात हजर केले असता 25 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. गुरुवारी त्यांची पोलीस कोठडी संपली असता पोलिसांनी सागर पाल आणि विकी गुप्ता या दोन आरोपींना एक्सप्लेनेड कोर्ट क्रमांक 37 (किल्ला कोर्ट) येथील अतिरिक्त दंडाधिकारी जोशी यांच्या पुढे हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 29 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता पोलीस चौकशीत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img