8 C
New York

Nashik Loksabha : नाशिक लोकसभा संदर्भातील पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भुजबळांचा हल्लाबोल, म्हणाले…

Published:

नाशिक

नाशिक लोकसभा (Nashik Loksabha) मतदार संघाबाबतीत महायुतीकडून (MahaYuti) अद्यापही तिढा कायम आहे. ही जागा कोणत्या पक्षाला सोडण्यात यावी याकरिता अद्यापही कुठलाही निर्णय झाला नसताना बीड लोकसभा (Beed Loksabha) मतदार संघाच्या उमेदवार तथा भाजपच्या (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी नाशिक मधून प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांच्या उमेदवारी संदर्भात मोठे वक्तव्य केले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी हल्लाबोल केला आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, बीड लोकसभा मतदार संघावर पंकजा मुंडे यांनी लक्ष दिले पाहिजेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवार नाही असे नाही. नाशिकमध्ये तिन्ही पक्षात खूप उमेदवार आहे. त्यामुळे त्यांनी बीडमध्ये लक्ष द्यावे असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गट भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दावा करण्यात येत आहे. मात्र अद्यापही कुठलाही निर्णय झालेला नाही आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चौथ्या टप्प्यात होणार आहे. नाशिक मध्ये शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन तिकीट आपल्यालाच मिळावं या संदर्भात प्रयत्न करत आहे. मात्र हेमंत गोडसे यांना भाजप मधून तीव्र विरोध होत आहे. तसेच भाजपकडून करण्यात आलेल्या सर्वे मध्ये हेमंत गोडसे डेंजर झोन मध्ये असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन उमेदवार कोण हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही आहे.

छगन भुजबळ यांनी काही दिवसापूर्वी नाशिक मतदारसंघात निवडणूक लढवण्यासंदर्भात तयारी सुरू केली होती. मात्र पक्षाकडून कुठल्याही आदेश न आल्याने अखेर भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक लढवण्यातून माघार घेतली होती. मात्र रविवारी झालेल्या समता परिषदेच्या बैठकीनंतर पुन्हा या मतदार संघावर दावा कायम असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अनेक उमेदवार आहे असे देखील भुजबळ यांनी म्हटले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img