23.1 C
New York

Manifesto 2024 : शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध; नेमकी काय दिली आश्वासनं?

Published:

पुणे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनाम्याला (Manifesto 2024) शपथनामा असे नाव देण्यात आले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर शपथनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये महिला, तरुण, तसेच कामगार यांच्यासह जतनिहाय जनगणना, शेतकऱ्यांना शेतमालाला हमीभाव यांसह शाळांचा सेफ्टी ऑडिट यांच्यासह अनेक मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे.

जाहीरनाम्यात काय दिली आश्वासनं?

– महिला, मुलींच्या सुरक्षेसाठी कडक कायदे करू

– सरकार आल्यावर कंत्राटी नोकरी भरती बंद करू

– आरोग्यासाठी उत्तम सेवा देऊ

– शेतकऱ्यांसाठी स्वांतत्र आयोग स्थापन करू

– स्पर्धा परिक्षांसाठी आकारलं जाणारं शुल्क माफ करू

– शेती, शैक्षणिक वस्तुंवर जीएसटी आकारणार नाही.

– सत्तेत आल्यावर जातीनिहाय जनगणना करू

– जेष्ठ नागरीकांसाठी आयोगाची स्थापना करू

– गॅसच्या किमती करून या 500 रुपयांपर्यंत निश्चित करून केंद्र सरकरकडून सबसिडी देणार.

– पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मर्यादित करू.

– केंद्र सरकारमध्ये 30 लाख शासकीय नोकऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. सत्तेत गेल्यावर रिक्त जागा भरण्याचा आग्रह धरू.

– महिलांना शासकीय नोकरीत 50 टक्के आरक्षण देऊ.

– एकच टॅक्स असला पाहिजे यासाठी राज्याला कर ठरवण्याचा अधिकार असला पाहिजे, सरकारला अधिकार मिळवून देणार.

– डिग्री आणि डिप्लोमा पास झाल्यावर विद्यार्थ्याला साडेआठ हजार शिष्यवृत्ती देणार

– महिला आणि मुलींसाठी शिक्षणासाठी येणारे अडथळे दूर करणार

– शाळा कॉलेजमध्ये सेफ्टी ऑडिट करणार

– शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत दर. त्यासाठी शेतकरी आयोग निर्माण करू

– सत्तेत आल्यावर जातीनिहाय जनगणना करू.

– आरक्षणाची 50 टक्क्यांची अट दूर करण्यासाठी विशेष कायदा करू

– खाजगी कॉलेजमध्ये आरक्षण ठेवण्याचं काम करू

– जेष्ठ नागरिकांसाठी आयोगाची स्थापना करू

– आरोग्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 4 टक्क्यांपर्यंत करू

– शिक्षणासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 6 टक्क्यांपर्यंत करू

– शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर शून्य टक्के जीएसटी असणार

– खाजगीकरण आम्ही मर्यादा आणू

– अग्निवीर योजना आम्ही बंद करू

– वन नेशन आणि वन इलेक्शन चर्चा करणे आता योग्य नाही, आधी आहेत त्या इलेक्शन यंत्रणा सक्षम करू

– प्रत्येक गरीब महिलेला वार्षिक 1 लाख देऊ

– अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवू

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img