23.1 C
New York

Mahesh Manjrekar : ट्रोलर्सना शोधून कानफटवेन- महेश मांजरेकर भडकले

Published:

कलाकार असो किंवा सेलिब्रिटी ट्रोलर्ससाठी तर ‘सॉफ्ट टार्गेट’ असतात. स्वतःची ओळख नाही, अस्तित्व नाही पण हे ट्रोलर्स अनेकदा क्षुल्लक कारणावरून, तर कधी कारण नसतानाही ट्रोल करत असतात. नुकतेच अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Manajrekar) आणि त्याच्या कुटुंबासोबत असंच काहीतरी घडतंय. मुलाच्या नावावरून चिन्मयला ट्रोलर्सचा सामना करावा लागतोय. मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवल्यामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबाला प्रचंड ट्रोल केलं जातंय. चिन्मय आणि त्याच्या पत्नीने व्हिडीओच्या माध्यमातून स्वतःच मत मोकळेपणाने व्यक्त केलंय. अशातच आता प्रसिद्ध निर्माते व दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांनी ट्रोलिंगवर संताप व्यक्त केला आहे. “माझी आई, माझे वडील, माझी मुलगी, माझी पत्नी यांना बोलायचा हक्क कोणालाच नाही. त्यांच्यावर टीका केली तर चवताळलेल्या माणसासारखा मी शोधून कानफटवेन”, अशा शब्दांत त्यांनी चोख उत्तर दिलेलं आहे.

महेश मांजरेकर ट्रोलिंगविषयी म्हणाले, “मला त्याचा भयंकर राग येतो आणि तो यायलाच हवा. अनेकजण म्हणतात की त्याकडे दुर्लक्ष करा. पण इतरांना ट्रोल करण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला? मी चित्रपट बनवतो. तो बघण्यासाठी तुम्ही तुमचा पैसा खर्च केला असेल तर त्यावरून बोलण्याचा हक्क तुम्हाला आहे. तुम्हाला चित्रपट आवडला की नाही ते सांगण्याचा अधिकार तुम्हाला आहे. त्यावर माझी काहीही म्हणणं नाही. कारण मी प्रेक्षकांच्या आवड-नावडीचा आदर करतो. पण मी एखादी पोस्ट लिहिली की त्यावरून माझी आई, माझे वडील, माझी मुलगी, माझी पत्नी यांना बोलायचा हक्क कोणालाही नाही. तसं झाल्यास मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन.”

ट्रोलिंगविरोधात कायदा असायला हवा, अशीदेखील त्यांनी मागणी केली आहे. “एकदा माझ्या मुलीबद्दल इतकं भीषण काहीतरी लिहिलं होतं. त्याला मी शोधून काढलं आणि तक्रार दाखल केली. अशा लोकांना आपण का माफ करावं? या सगळ्यांविरोधात जेव्हा एखादा कायदा तयार होईल, तेव्हा अशा पद्धतीचे आक्षेपार्ह कमेंट्स बंद होतील”, असं त्यांनी पुढे वक्तव्य केलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img