23.1 C
New York

Lara Dutt: ट्रोलर्सला लारा दत्ताने दिलं प्रतिउत्तर…

Published:

मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री लारा दत्ता (Lara Dutt) सध्या आगामी ‘स्ट्रॅटेजी: बालाकोट अँड बियॉन्ड’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. लाराने अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. मात्र, मागील काही वर्षांपासून ती अभिनयक्षेत्रापासून दूर होती. आता तिने वेब सिरीजच्या माध्यमातून पुन्हा कमबॅक केल्याचं पाहायला मिळतंय. तिला ट्रोल केल्याबद्दल तिने एका मुलाखतीत आपले मत मांडला आहे. लाराने नकारात्मक कमेंट्स व ट्रोलिंगबद्दल तिला काय वाटतं ते सांगितलं.

“मी सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसते. आहे. जर मला सतत फॉलोअर्स, लाईक्स आणि कमेंट्सची पाहिजे असतील, तर मला त्यासोबत येणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी तयार राहावं लागेल,” असं लारा म्हणाली. ती इंस्टाग्रामवर जास्त सक्रिय नसल्याने तिचे फॉलोअर्स देखील कमी आहेत. याबद्दल “माझ्या सोशल मीडिया फीडमध्ये माझ्यासाठी खास गोष्टी आहेत, माझे खरे फॉलोअर्स आहेत त्यांना मला त्या गोष्टी शेअर करायला आवडतात. म्हणूनच माझे फारसे फॉलोअर्स नाहीत, पण जे लोक सोशल मीडियावर खरे आहेत, ते कधीच तुम्हाला वाईट बोलणार नाहीत. मला खूप ट्रोलिंग आणि अश्लील कमेंट्ससारख्या गोष्टींना सामोरं जावं लागत नाही, असं मला वाटतं.”


लारा पुढे म्हणाली, “लोकांना त्यांची मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतु, मला म्हातारी, जाड म्हंटल्याने माझ्या आयुष्यात त्याचा काहीहि परिणाम होणार नाही.” दरम्यान, लारा लवकरच ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटात झळकणार आहे. हा ‘वेलकम’ चित्रपटाचा तिसरा भाग आहे. यामध्ये अक्षय कुमार, संजय दत्त, परेश रावल, रवीना टंडन, सुनील शेट्टी, अर्शद वारसी, जॅकलीन फर्नांडिस व दिशा पाटनी यांच्याही भूमिका असतील.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img