26.6 C
New York

Juducial Employees : मुंबई जिल्हा न्यायालयीन कर्मचाऱ्यांतर्फे संयुक्त जयंती उत्सव

Published:

रमेश औताडे/मुंबई
मुंबई जिल्हा न्यायालयीन कर्मचारी (Judicial Employees) संयुक्त जयंती उत्सव समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पार पडला.

प्रमुख पाहुणे म्हणून न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती सारंग कोतवाल, न्यायाधीश अभय आहूजा, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष शरद साळवे, कार्याध्यक्ष रवी पवार, सचिव संजय शेलार, सल्लागार चंद्रकांत बनकर, खजिनदार किरण कांबळे तसेच कार्यकर्ते निलेश तायडे, प्रशांत दाभाडे यांनी मेहनत घेतली.
अशाप्रकारे जयंतीचे कार्यक्रम दरवर्षी आयोजित झाले पाहिजे, अशी अपेक्षा न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी व्यक्त केली. याप्रसंगी न्यायमूर्ती श्रीमती शर्मिला देशमुख म्हणाल्या, “आज मी जी न्यायमूर्ती आहे, ती केवळ या महामानवामुळे आहे.” मकरंद कर्णिक व न्यायमूर्ती अभय आहूजा यांनी या तिन्ही महापुरुषाबद्दल गौरवोद्गार काढले आणि आपल्या सर्वांवर यांचे कसे उपकार आहेत, त्याची जाणीव करून दिली.
सूत्रसंचालन संजय शेलार यांनी केले तर प्रास्ताविक शरद साळवे यांनी केले. आभार प्रदर्शन चंद्रकांत बनकर यांनी केले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img