26.6 C
New York

Daily Horoscope : आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या

Published:

विनायक करंदीकर
९९२०४६२३३३

दिनांक : २५ एप्रिल २०२४
शके १९४६
मराठी महिना : चैत्र
सूर्योदय : सकाळी ०६. १३
सूर्यास्त : सायंकाळी ६.५८
वार : गुरुवार
तिथी : द्वितीया
नक्षत्र : विशाखा
योग : व्यतिप्त
राहू काल : दु. २.११ ते ३. ४७

Daily Horoscope

मेष
आज तुम्हाला घराबाहेर पडणे भाग पडेल.
पर्यटन, शिपिंग, मत्स्यपालन, आयात-निर्यात क्षेत्रातील लोकांना दिवस लाभदायी.
धार्मिक ठिकाणी कौटुंबिक सहल काढाल.
काही लोकांना लठ्ठपणाचा, कटिप्रदेशाचा त्रास होऊ शकतो.
शुभ अंक : १
शुभ रंग: नारिंगी

वृषभ
बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
कन्सल्टन्सी, माध्यम, गूढ विज्ञान, पर्यटन, विमा क्षेत्रातील लोकांना लाभदायी.
आज सासरी कोणाची तरी किंवा लहान भावंडाची प्रकृती बिघडू शकते.
काही लोकांना स्नायूदुखी, श्वसनाचा त्रास होऊ शकतो.
शुभ अंक : ५
शुभ रंग : हिरवा

मिथुन
नोकरीची बढतीचा योग.
शिक्षण, धर्म, कायदा, न्यायालय, पर्यटन यांसारख्या क्षेत्रातील लोकांना यश मिळेल.
व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनातील प्रश्न सुटतील.
काही लोकांना गुडघेदुखी, कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो.
शुभ अंक : ८
शुभ रंग: काळा

कर्क
करिअरमध्ये प्रगतीसाठी आजचा दिवस चांगला
कायदा, धर्म, पर्यटन, शिक्षण क्षेत्रातील लोकांना फायदा होईल.
सैनिक प्रशिक्षण शिबिरात सहभागी होऊ शकतात.
धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
उच्च शिक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिवस चांगला
काही लोकांना स्नायुदुखी, श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो.
शुभ अंक : ३
शुभ रंग: पिवळा

सिंह
आज तुम्हाला माघार घ्यावी लागेल. शहाणपणाने निर्णय घ्या.
कायदा, बांधकाम क्षेत्रातील लोकांना यश मिळेल.
वडील- मुलामध्ये वादाचे प्रसंग
काही लोकांना स्नायूदुखी, दमा, मूळव्याधीचा त्रास होऊ शकतो
शुभ अंक : ९
शुभ रंग: लाल

कन्या
आजचा दिवस चांगला नाही. तडजोड करावी लागेल.
शिक्षण, बिल्डर क्षेत्रातील लोकांना यश मिळेल.
धार्मिक कार्यात सहभागी व्हाल
काही लोकांना स्नायूदुखी, अपचनाचा त्रास होऊ शकतो.
शुभ अंक : ८
शुभ रंग: निळा

तूळ
आज तुमच्या व्यवसायात स्थिरता येईल.
प्रवास, धर्म, शिक्षण, संवाद, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना लाभदायी.
पती-पत्नीत वाद
काही लोकांना जळजळ, श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो.
शुभ अंक : ५
शुभ रंग : हिरवा

वृश्चिक
आज ध्यानधारणा करा.
धार्मिक कार्यातील व्यक्ती, व्याख्याते, बँकिंग, फायनान्स, शेअर व्यापारी, शिक्षक यांना यशदायी.
कुटुंबातील सदस्यांमध्ये वादाचे संकेत
काही लोकांना घसादुखी, पाठदुखीचा त्रास होऊ शकतो.
शुभ अंक : ३
शुभ रंग: पिवळा

धनु
ध्यानधारणा करण्याचा दिवस
शिक्षण, सल्लागार, वकील क्षेत्रातील लोकांना फायदेशीर
कुटुंबात वाद होतील.
काही लोकांना डोकेदुखी, खांदेदुखीचा त्रास
शुभ अंक : ९
शुभ रंग: लाल

मकर
प्रवास घडेल
पर्यटन, धर्म, शिक्षण, मध्यम क्षेत्रातील लोकांना फायदेशीर
तीर्थयात्रा, परदेशी प्रवास घडेल.
काही लोकांना कानाच्या समस्यांचा त्रास होऊ शकतो
शुभ अंक : ७
शुभ रंग: गुलाबी

कुंभ
आज यश साजरे करण्याचा दिवस
बँकिंग, सल्लागार क्षेत्रातील लोक यशस्वी होतील.
आईचे नातेवाईक तुमच्या घरी भेट देऊ शकतात.
काही लोकांना गॅस, स्नायूदुखीचा त्रास होऊ शकतो
शुभ अंक : ५
शुभ रंग : हिरवा

मीन
कामात स्वतःला झोकून द्याल.
बँकिंग, उत्पादन, समुपदेशक क्षेत्रातील लोकांना फायदा होईल.
घरगुती कार्यक्रमात सहभागी व्हाल.
काही जणांना स्थूलपणाचा त्रास होऊ शकतो.
शुभ अंक : २
शुभ रंग : पंधरा

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img