रमेश औताडे/मुंबई
लोकसभा निवडणुकीत संविधान (Constitution of India) वाचवण्याकरिता इंडिया आघाडीला (INDIA Alliance) पाठिंबा दिला असल्याची माहिती खोरीपाचे मुंबई कार्याध्यक्ष सलीम खतीब (Salim Khatib) यांनी ट्रॉम्बे येथील जाहीर सभेत दिली.
लोकसभा निवडणुकीच्या वातावरणात बदल होत आहे. देशातील जनतेने निवडणूक आपल्या हातात घेतली आहे. विद्यार्थी दिशा बदलत आहेत, हे येणाऱ्या काळात दिसून येईल, असे सलीम खतीब यांनी सांगितले. हुकूमशाही सरकारच्या विरोधात देशातील वातावरण बदलले आहे. देशातील जनतेने आता ही निवडणूक स्वतःच्या हातात घेतली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सत्ता बदल होणार आहे. सध्या ही निवडणूक देशातील विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्यासाठी हातात घेतली आहे. त्यामुळे येणाऱ्या चार जून रोजी देशात सत्ता परिवर्तन होणार आहे, असे खतीब यांनी सांगितले.
देशामध्ये मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर काहीही बोलत नाहीत. दहा वर्षात सामान्य माणसाचा कुठल्याही प्रकारचा विकास करता आला नसल्याने सध्या कुठलेही मुद्दे प्रचारासाठी नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलणाऱ्या विरोधात एकजुटीने उभे राहण्यासाठी हा पाठिंबा दिला आहे, असेही खतीब यांनी स्पष्ट केले.