23.1 C
New York

Chinmay Mandlekar: चिन्मय मांडलेकरला दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान…

Published:

लेखक, दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar). मराठीसह हिंदी विश्वात पदार्पण करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा चिन्मय सध्या चर्चेत आहे. मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवल्यामुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. एवढंच नाहीतर चिन्मयच्या पत्नीला देखील ‘भारत सोडून जा’, ‘अफगाणिस्तान किंवा पाकिस्तानात राहायला जा’, असे मेसेज केले होते. त्यामुळे संतापून त्याने यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका न करण्याचा निर्णय घेतला.

अजूनही चिन्मयच्या ट्रोलिंग प्रकरणाला पूर्णविराम लागलेला नाही. पण अशातच, काल, २४ एप्रिलला दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यात चिन्मयला त्याच्या ‘गालिब’ नाटकासाठी गौरविण्यात आलं. चिन्मय मांडलेकरला मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्काराने गौरविण्यात आलं. या सोहळ्याला बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन, मंगेशकर कुटुंबीय, अशोक सराफ असे बरेच मान्यवर उपस्थित होते.

मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८२ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित पुरस्कार सोहळा होता. हा सोहळा दीनानाथ नाट्यगृहात पार पडला. दरवर्षी मंगेशकर प्रतिष्ठानातर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारिता, सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो.


यावेळी आपल्या भाषणातून चिन्मयने सर्वांचे आभार मानले. त्याचसोबत ‘अशी ही बनवाबनवी’ कमीत कमी १०० वेळा पाहिला आहे असल्याचं सांगितलं . ‘गालिब’ या नाटकांचे लेखन, दिग्दर्शन चिन्मय मांडलेकरने केले आहे. तसाच यात विराजस कुलकर्णी, गौतमी देशपांडे, अश्विनी जोशी, गुरूराज अवधानी यांची प्रमुख भूमिका आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img