23.1 C
New York

Baramati Loksabha : आईसाठी काय पण… लेक उतरली प्रचाराच्या मैदानात

Published:

बारामती

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Elections) सर्वात हाय होल्टेज लोकसभा मतदारसंघ असलेल्या बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात सुळे यांच्या विरोधात अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या सुमित्रा पवार (Sumitra Pawar) निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक शरद पवार (Sharad Pawar) विरुद्ध अजित पवार (Ajit Pawar) अशी असणार आहे. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांचे कुटुंब वगळता संपूर्ण पवार कुटुंब सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ बारामती मतदारसंघात फिरताना दिसत आहे. त्यातच आता आई सुप्रिया सुळेच्या प्रचारासाठी मुलगी रेवती सुळे (Revati Sule) देखील मैदानात उतरले आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आईसाठी चक्क मुलगा उन्हामध्ये प्रचाराला सुरुवात केली आहे. आजपर्यंत राजकीय व्यासपीठापासून आणि राजकीय कार्यक्रमापासून दूर राहिलेले रेवती सुळे आज आईच्या प्रचारासाठी राजकीय मैदानात उतरले आहे. आई सुप्रिया सुळे यांना निवडून येण्याकरिता करत असलेल्या प्रचाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

परिवारात फूट पडल्यानंतर पवार कुटुंबीय सु्प्रिया सुळेंच्या मागे ठामपणे उभे आहे. पुतणे, भाचे, चुलते, सगळे सुप्रिया सुळेंचा जोरदार प्रचार करत आहे. आता सुप्रिया सुळेंचा मुलगा आणि लेक देखील सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सुप्रिया सुळे यांची दोन्ही मुलं म्हणजेच लेक रेवती व मुलगा विजय हे सुद्धा आईच्या प्रचारासाठी सहभागी होणार आहेत. पार्थ पवार आणि रोहित पवार यांच्याप्रमाणे शरद पवारांची सख्खी नातवंडे अद्याप राजकीय आखाड्यापासून दूर असल्याने त्यांचे फारसे दर्शन घडत नाही.

बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनीता पवार या महायुतीच्या वतीने अजित पवार गटाच्या उमेदवार आहे. अजित पवार यांनी घेतलेली भूमिका पवार कुटुंबीयांतील व्यक्तींना पसंत नसल्याचे अनेकदा कुटुंबातील व्यक्तींनी बोलून दाखवले होते त्याचा प्रत्यय आता लोकसभा निवडणुकीमध्ये दिसत आहे अजित पवार यांचे कुटुंब वगळता संपूर्ण पवार कुटुंबियांनी शरद पवार यांना साथ देत बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत आहे यात अजित पवार यांचे सख्य पुतणे युगेंद्र पवार हे देखील सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img