दिवंगत अभिनेते इरफान खान (Irfan Khan) यांनी त्यांच्या विविधांगी भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ‘पान सिंग तोमर’, ‘अंग्रेजी मीडियम’, ‘लाईफ ऑफ पाय’ अशा अनेक चित्रपटामध्ये त्यांनी उत्कृष्ट भूमिका साकारली. तसंच त्यांच्या अभिनयाच कौतुक आजही मनोरंजसृष्टीत केलं जातं. त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा बाबिल खानही (Babil Khan) सिनेसृष्टीत उतरला.
बाबिल सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. अभिनयासह वैयक्तिक आयुष्यातल्या ही गोष्टी तो चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. सध्या अन्विता दत्त लिखित, दिग्दर्शित ‘कला’ या चित्रपटाद्वारे बाबिलने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. परंतु, बाबिलने टाकलेल्या पोस्टमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
बाबिल खानने २४ एप्रिलला रात्री त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली होती. यात त्याने लिहिलं होतं की, “कधी कधी मला हार मानावीशी वाटते आणि सगळं सोडून बाबांकडे जावस वाटतं.” बाबिलच्या या पोस्टने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. दरम्यान बाबिलने ही पोस्ट आता डीलीट केली असली तरी त्याच्याबद्दल काळजी व्यक्त केली जात आहे. चाहत्यांनकडून त्याला सकारात्मकत्याचे संदेश देण्यात येत आहेत. दरम्यान, बाबिल ‘द उमेश क्रोनिकल्स’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याला बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह काम करण्याची संधी मिळाली आहे. लवकरच हा चित्रपट रिलीझ होऊन तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.