3.6 C
New York

Ashok Saraf : एका असामान्य परिवाराकडून हा पुरस्कार; अशोक सराफ झाले भावनिक…

Published:

आपल्या अष्टपैलू भूमिकांमधून प्रत्येकाच्या मानावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf). मराठी कलाविश्वात ‘मामा’ म्हणून ओळखले जाणारे. त्याचसोबत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अशोक सराफ. त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ नंतर आता पुन्हा एकदा मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

अशोक सराफ यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्काराने गौरविण्यात आलं. या सोहळ्याला बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन, मंगेशकर कुटुंबीय, चिन्मय मांडलेकर असे बरेच मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर अशोक सराफ अतिशय भावुक झाले. त्यांनी उपस्थित मान्यवरांसमोर भावनिक भाषण केलं. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८२ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित पुरस्कार सोहळा होता. हा सोहळा दीनानाथ नाट्यगृहात पार पडला. दरवर्षी मंगेशकर प्रतिष्ठानातर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारिता, सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो.

अशोक सराफ म्हणाले, “या मंचावर आता माझ्याबरोबर सगळे थोर कलावंत बसलेले आहेत. यांच्यासमोर माझा सन्मान होणं ही खरंच मोठी गोष्ट आहे. आजवर मला अनेक पुरस्कार मिळाले. आता मला मोजताही येत नाही आणि आठवतही नाही. पण, आजचा हा पुरस्कार माझ्यासाठी फारच महत्त्वाचा आहे. एका असामान्य गायक कलाकाराच्या म्हणजेच मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने एका कलाकाराला मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी खूप मोठा आहे. एका असामान्य परिवाराकडून हा पुरस्कार मला मिळतोय आणि आज इथे एक मोठा असामान्य नट देखील उपस्थित आहे. ही सगळ्यात मोठी आणि माझ्या कायम लक्षात राहणारी गोष्ट आहे.”

“हा सन्मान केवळ माझ्या एकट्याचा नसून इथे उपस्थित सर्व कलाकारांचा आहे. कलाकार त्याच्या परीने वेगवेगळे प्रयोग करत असतो. पण, ते प्रयोग तुम्हाला पटले नाहीत तर, त्याचा काहीच उपयोग नसतो. पण, मी केलेलं काम तुम्हाला आवडलं, तुम्ही दरवेळी त्याबद्दल तुमच्या भावना व्यक्त केल्या यासाठी मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे.

आज मी माननीय हृदयनाथ मंगेशकर आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचे आभार मानतो की, त्यांनी मला या पुरस्काराने गौरविण्यात आलं. माझी एवढ्या वर्षांची तोडकी मोडकी सेवा त्यांनी समजून घेतली त्यासाठी मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. हा क्षण माझ्या कायम मनात राहील आणि मी कधीही विसरू शकणार नाही.” असं अशोक सराफ यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img