23.1 C
New York

Weather Update : महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळीचं संकट; ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Elections) राजकीय वातावरण तापलेले असताना मात्र विदर्भात हवामान (Maharashtra Weather) विभागाने वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल रोजी होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 48 तासांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यावर गारपीट आणि अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) सावट असल्याचं म्हटले आहे. तर मुंबई आणि कोकणाच्या तापमानात आणखी (Weather Update) होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सतत राज्यातील हवामानात बदल होत आहेत. राज्याच्या अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, काही भागांत उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. अशात, मुंबई आणि कोकणात पुढील 48 तासांमध्ये तापमानात आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. तसेच, कोकण किनारपट्टीवरील भागातही उकाडा वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचप्रमाणे विदर्भ आणि मराठवाड्यावर मात्र गारपीट आणि अवकाळी पावसाचे सावट कायम असून, काही क्षेत्रांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, अमरावती, वर्धा, नागपूर आणि यवतमाळ येथे गारपीट आणि ताशी 40 ते 50 किमी वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने येथील नागरिकांना शक्यतो घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांत राज्यातील दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा 30-40 किमी प्रतितास वेग हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, मुंबई शहर आणि उपनगरात आकाश निरभ्र राहील. उपनगरात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img