23.1 C
New York

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल, म्हणाले…

Published:

नांदेड

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) दुसऱ्या टप्प्यातील प्रचार आज थंडावणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना मोदी सरकारने सत्तेचा गैरवापर करत गद्दारांच्या हातात दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संकटात असताना ज्या शिवसेनेने मोदींना साथ दिली होती, त्याच शिवसेनेच्या सातबारावरचं नाव बदलून गद्दारांच्या नावावर करण्यात आलं आहे.

महाविकास आघाडी उमेदवाराच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये प्रचार सभा घेण्यात यावी, अशी सर्वांचीच इच्छा होती. मात्र, वेळेच्या अभावी सभा आयोजित न करता पत्रकार परिषद घेण्यात येत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या नावाने नवीन आघाडी सत्तेत आली, त्यावेळी या आघाडीचे नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून माझ्या हातात होते. सर्वच मित्र पक्षांनी त्यावेळी मला उत्तम साथ दिली. मात्र, मधल्या काळात काही गद्दारांनी गद्दारी केली. ही गद्दारी झाली नसती तर महाविकास आघाडीने राज्याला पुढे नेले असते. 2019 च्या निवडणुकीनंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित आले होतो. मात्र, पहिल्यांदाच आता लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित लढत आहे. तिन्ही पक्षांमध्ये उत्तम ताळमेळ आहे. तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत. या सर्वांची एकजूट पाहिल्यावर महाविकास आघाडीचा विजय निश्चित होईल, असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, देशामध्ये मोदी सरकार विरोधात मोठी लाट उसळली आहे. मोदी सरकार विरोधात जनमाणसांमध्ये तीव्र राग असल्याचे दिसून येत आहे. मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले तर देशाचे संविधान बदलण्याची भीती लोकांच्या मनात दिसत आहे. गेल्या काही वर्षात परिस्थिती तशीच दिसते. प्रचारावेळी काही शेतकरी भेटले. शेतकरी स्वतःहून सांगत आहेत की यावेळी आमचे मत महाविकास आघाडीला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने आम्हाला कर्जमुक्ती दिली होती. केंद्र सरकारने दहा वर्षात शेतकऱ्यांना केलेली कुठलीही आर्थिक मदत मिळाली नसल्याचे देखील अनेक शेतकरी मला सांगतात.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img