23.1 C
New York

Ranveer Singh: रणवीर सिंग अडकला वादाच्या भोवऱ्यात! नेमकं प्रकरण काय?

Published:

सध्या लोकसभा निवडणुकीच्या वातावरणात बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंहचा (Ranveer Singh) व्हिडिओ व्हायरल झाला आहे. १४ एप्रिल रोजी वारणासी येथे एक फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह या कार्यक्रमला उपस्थित होता. त्याने यावेळी काशी विश्वेश्वराचं देखील दर्शन घेतलं होतं. त्याच्यासोबत अभिनेत्री क्रिती सेननदेखील उपस्थित होती. पण यानंतर अभिनेता रणवीर सिंह चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

वाराणसीमध्ये एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतानाच हा व्हिडिओ आहे. यात रणवीरचा आवाज वापरून नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करण्यात आली होती. त्यानंतर रणवीरच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार देखील केली. त्यांच्या तक्रारीवरुन आता महाराष्ट्र सायबर पोलिसांनी मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणवीरचा हा डीपफेकचा व्हिडिओ सोशल मीडियावरही तुफान व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतंय. या व्हिडिओमध्ये रणवीर एका राजकीय पक्षाचा प्रचार करताना दिसत आहे.

तसेच तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका करत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यावर रणवीरच्या वडिलांनी पोलिसात तक्रार केलीये. पोलिसांत तक्रार केल्यानंतर रणवीर सिंहच्या टीमने बोलताना म्हटलं की, संबंधित सोशल मीडिया हँडलच्या विरोधात एफआयआर देखील नोंदवण्यात आला आहे. या तक्रारीनंतर सायबर गुन्हे शाखेत आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सध्या डीपफेक व्हिडिओचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि काही केल्या कमी होती नाहीये. त्यामुळे यावर कठोर कारवाई करण्याची मागणी कलाकारांकडून वारंवार केली जातेय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img