23.1 C
New York

Nitin Gadkari : नितीन गडकरी यांना भरसभेत भोवळ

Published:

२०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना भरसभेत भोवळ येण्याचा प्रकार तीन चार वेळा घडला होता. बुधवारी पुन्हा गडकरी यांना भाषण सुरु असतानाच भोवळ आली. व्यासपीठावरच ते कोसळत असताना अंगरक्षकाने (Bodyguard) त्यांना सावरले. गडकरी यांची प्रकृती सध्या स्थिर (Stable) आहे.

महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ बुधवारी यवतमाळच्या पुसद येथे नितीन गडकरी यांची सभा होती. गडकरी यांचे भाषण सुरु असतानाच अचानक भोवळ येऊन ते स्टेजवर कोसळत होते. त्यांच्या अंगरक्षकाच्या हि बाब लक्षात येताच त्याने गडकरी यांना सावरले. गडकरी कोसळतायत हे लक्षात येताच भाजप पदाधिकारी देखील धावले. त्यांनी भाषण अर्धवट सोडत तिथेच विश्रांती घेतली. गडकरी यांच्या सोबत असलेल्या डॉक्टर पथकाने त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली. बरे वाटल्यानंतर गडकरी यांनी पुन्हा भाषण केले.

सर्वत्र लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरु असताना सूर्याचा प्रकोफी सुरु आहे. अनेक ठिकाणी तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. याचा प्रचारावर परिणाम होताना दिसत आहे. दुपारच्या वेळी सभा, प्रचारफेऱ्या घेताना उमेदवारांना उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागत आहे. गडकरी यांना २०१९ च्या लोसकभ आणि विधानसभा निवडणुकीवेळी भरसभेत भोवळ आल्याचे प्रकार तीन ते चार वेळा घडले होते. आता यावेळी पुन्हा हाच प्रकार घडला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img