बजरंगी भाईजान, सकॅरेड गेम्स, गँग ऑफ वासेपूर आणि आपल्या अष्टपैलू अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन (Nawazuddin Siddiqui). तो नेहमीच वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. आपल्या अभिनयनाचा ठसा उमटवणारा अभिनेता नवाजुद्दीन त्याच्या पाऊलावर पाऊल ठेवून लेक शोरा लवकरच इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. तिचं नाव शोरा सिद्दिकी आहे.
१३ वर्षांची असून तिला आर्ट, अभिनयाची आवड आहे.नवाजुद्दीन स्वतः अभिनयाचे वर्कशॉप घेतो. ती सध्या अभिनयाचे धडे शिकत आहे. आपल्या तालमीत तयार करणाऱ्या कलाकारांच्या यादीत शोराचा ही समावेश आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीनने त्याच्या लेकीच्या करिअरविषयी सांगितलं. मुलीचं कौतुक करताना तो म्हणाला, ती १६ वर्षांची आहे. तिने तिचे स्वप्ने पूर्ण करावीत. अॅक्टिंग स्कूल मध्ये तिने प्रवेश घेतला आहे. आणि मला तिला असिटिंग शिकवायला नक्कीच आवडेल असा देखील त्याने सांगितलं. नवाजुद्दीन ‘टिकू वेड्स शेरू’ मध्ये दिसला होता. सध्या तो त्याच्या आगामी चित्रपटाची तयारी करत आहे. कबीर खान दिग्दर्शित ‘पवन पुत्र भाईजान’ या चित्रपटात नवाजुद्दीन झळकणार आहे.