8.7 C
New York

Mumbai Airport : मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या मोठी कारवाई, हिरे आणि सोन्याची बिस्किटे जप्त

Published:

मुंबई

मुंबई विमानतळ (Mumbai Airport) देशातील सर्वाधिक वर्दळीचे विमानतळ आहे. मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या कारवाईच्या माध्यमातून सहा कोटी पेक्षा अधिक रक्कम जप्त केली आहे. मुंबईवरून बँकॉकला जाणाऱ्या प्रवाशाकडून दोन कोटी रुपयाचा हिरे नूडल्सच्या पाकिटांमध्ये नेत असताना जप्त करण्यात आला आहे. तर दुसऱ्या प्रवाशांकडून अंतर्वस्त्रात सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मोठे यश आले आहे. कस्टमने एकूण 6.46 कोटी रुपयांच्या तस्करीचा माल 13 वेगवेगळ्या प्रकरणात ताब्यात घेतला आहे.

सीमा शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मुंबई विमानतळावर सोन्याची स्मगलिंग करण्यात येत असल्याची माहिती खबरींकडून मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे सीमा शुल्क विभागाने मुंबई विमानतळावर सापडा रचून तपासा दरम्यान या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावरुन हिऱ्यांची तस्करी होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. यामुळे सर्वांची कसून चौकशी सुरु होती. एका व्यक्तीची तपासणी केली असता नूडल्सच्या पाकिटांमध्ये हिरे सापडले. त्या हिऱ्यांची किंमत 2 कोटी 2 लाख रुपये आहे. हा व्यक्ती मुंबईवरुन बँकॉकला जात होता.

मुंबई विमानतळावर श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबो येथून मुंबईत दाखल झालेल्या एका प्रवाशाची सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. त्यावेळी त्याच्या अंतर्वस्त्रात 321 ग्रॅम सोने लपविल्याचे आढळले. तसेच अबुधाबी, दुबई, बहरिन, रियाध, मस्कत, बँकॉक आणि सिंगापूर येथून मुंबईत दाखल झालेल्या दहा प्रवाशांकडे एकूण 6 किलो 199 ग्रॅम सोन्याच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या कारवाईत 4 कोटी 4 लाखांचे सोने व 2 कोटी 2 लाखांचे हिरे असा एकूण 6 कोटी 6 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img