9.6 C
New York

Manoj jarange : मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, छत्रपती संभाजीनगरला हलवण्यात आले

Published:

राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, राजकीय नेते प्रचाराला लागले आहेत. तर, मराठा आरक्षणासाठी लढलेले उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) निवडणुकीच्या राजकारणापासून दूर आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच त्यांनी आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या बैठका आणि दौरे सुरू असून त्यांनी बीड जिल्ह्यात लक्ष केंद्रीत केले आहे. आजही बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना तातडीने बीड येथून छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे.

मनोज जरांगे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मराठा आरक्षण दौऱ्यानिमित्त ते बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे मनोज जरांगे यांनी बीड दौरा अर्धवट सोडून छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरू झाले आहेत. मागील वेळेप्रमाणेच त्याला अशक्तपणा आला असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, याआधीही जरांगे पाटील यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळीही अशक्तपणामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उपचारानंतर ते पुन्हा त्यांच्या मराठा आरक्षणाच्या कामात सक्रिय झाले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img