23.1 C
New York

Loksabha Elections : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात आठ लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे. निवडणुकीच्या दरम्यान पंधरा दिवस विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडल्या. आता 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील आठ लोकसभा मतदारसंघांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. यामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ- वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी आणि वर्धा या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. आज या मतदारसंघात प्रचाराचा तोफा सायंकाळी पाच नंतर थंडावणार आहे.

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. कुठलीही अनुचित प्रकार घडू नये याकरिता प्रत्येक ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांना ईव्हीएम संदर्भातील संपूर्ण ट्रेनिंग देण्यात आले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आजचा आखरीचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून सभेची धावपळ सुरू आहे. आज अमरावतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माहितीच्या उमेदवाराच्या साठी प्रचार सभा होणार आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मराठवाड्यात जाहीर सभा होणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img