23.1 C
New York

Loksabha Elections : दुसऱ्या टप्प्यातही मोदी- शहांच्या सभांचा धुरळा

Published:

मुंबई

महाराष्ट्राच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचारात मोदी-शहा ही जोडगोळी जोरदार प्रचार करताना दिसतेय. तर दुसरीकडे त्यांना रोखण्यासाठी मविआकडूनही जोरदार प्रतिवार होताना दिसतायत. शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दोघंही महाराष्ट्रात प्रचाराचा धुराळा उडवताना दिसतायेत. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पहिल्या टप्प्यात देशभरात मतदानाचा टक्का घसरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमक झालेले दिसतायेत. भाजपच्या प्रचाराची मुख्य धुरा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शहा (Amit Shah) यांच्याच खांद्यावर आहे. महाराष्ट्रातही या नेत्यांच्या सभांचा धडाका पाहायला मिळतोय. दुसऱ्या टप्प्याच्या आधी मुस्लीम लांगूलचालन, संपत्तीचं घुसखोरांना वाटप अशा मुद्द्यांवर मोदी आणि शहा काँग्रेसची अडचण कराताना दिसतायेत. तर संतापलेल्या इंडिया आघाडीकडून याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आलीय.

पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन सभा पूर्व विदर्भात घेतल्या. यात चंद्रपूर, रामटेक, भंडारा आणि
वर्ध्यात मतदानाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार पडली. तर अमित शहा यांनी रामटेक, भंडारा, नांदेडमध्ये सभा घेतल्या आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात मोदी-शहा जोडगळीच्या सभा एप्रिल अखेरपर्यंत होणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यात 20 एप्रिलला नांदेडमध्ये तर महादेव जानकरांसाठी परभणीत त्याच दिवशी मोदींची सभा पार पडली.

पंतप्रधान मोदींच्या प्रचाराचा झंझावात

29 एप्रिल – लातूर
27 एप्रिल – कोल्हापूर
29 एप्रिल- पुणे
30 एप्रिल- सोलापूर
30 एप्रिल- सातारा
30 एप्रिल – माढा

अमित शहांच्या प्रचारसभा

23 एप्रिल – अकोला
24 एप्रिल – अमरावती
26 एप्रिल – सोलापूर

या सगळ्या सभांमध्ये 10 वर्षांतली मोदी सरकारची कामगिरी सांगतानाच, काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर सडकून टीका करण्यात येतेय. प्रामुख्यानं राम मंदिर, हिदुंत्व, काँग्रेसनं केलेला अन्याय हे सांगण्यात येताना दिसतंय.

पवार-ठाकरेही रिंगणात

मोदी-शहा यांच्या या प्रचाराचा मुकाबला करण्यासाठी महाविकास आघाडीचे दोन नेते मैदानात आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेही दुसऱ्या टप्प्यात जास्तीत जास्त सभा घेताना दिसतायेत.

शरद पवार- उद्धव ठाकरे एकत्र सभा
22 एप्रिल अमरावती
22 एप्रिल वर्धा
29 एप्रिल- पुणे

उद्धव ठाकरेंच्या सभा
21 एप्रिल – बुलढाणा
23 एप्रिल – परभणी
24 एप्रिल- हिंगोली

शरद पवारांच्या सभा
18 एप्रिल- बारामती, शिरुर
20 एप्रिल- मनमाड, चोपडा
21 एप्रिल – रावेर, मोर्शी
23 एप्रिल – अलिबाग, कुर्डुवाडी
24 एप्रिल- माढा, वाई, भोर
25 एप्रिल- शेवगाव, माजलगाव

या सभांमधून नरेंद्र मोदींच्या 10 वर्षांतल्या कामगिरीवर टीका करण्यात येतेय. महायुतीतील शिंदे-फडणवीस हे नेतेही मुख्य लक्ष्य असल्याचं पाहायला मिळतंय.

पुण्यात मोदी- पवार आमनेसामने

२९ एप्रिलला हे पंतप्रधान मोदी आणि ठाकरे-पवारांची सभा एकाच दिवशी पुण्यात होणार आहे. एकाच दिवशी या दोन्ही सभा पुण्यात होणार असल्यानं 29 एप्रिल हा पुणेकरांसाठी महत्त्वाचा दिवस ठरेल. ही लढाई विचारांच्या संघर्षाची आहे, अशा प्रतिक्रिया मविआ नेत्यांकडून व्यक्त होतायेत. पुण्यात भाजपाकडून मुरलधीर मोहोळ तर मविआकडून रवींद्र धंगेकर हे रिंगणात आहेत. वंचितच्या वतीनं वसंत मोरेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img