23.1 C
New York

Inheritance Tax : सॅम पित्रोदांच्या ‘त्या’ वक्तव्याने नवा वाद

Published:

काँग्रेसचे विदेशातील अध्यक्ष सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांनी कुटुंबाच्या वारसा संपत्तीबाबत (Inheritance Tax) केलेल्या विधानावरून नवा वाद निर्माण झाला आहे. पित्रोदा यांच्या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी हल्लाबोल केला आहे. तर पित्रोदा यांनी आपण हे विधान भारतासंदर्भात केले नव्हते. त्याचा पंतप्रधान आणि मीडियाने विपर्यास केला, असे स्पष्ट केले आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सॅम पित्रोदा यांनी म्हटले आहे कि, अमेरिकेत सरकारने वारसा कर नावाचा एक कर लागू केला आहे. एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या वारसांना ४५ टक्के संपत्ती मिळते तर ५५ टक्के संपत्ती सरकार जमा होते. तुम्ही कमावलेल्या संपत्तीचा तुमच्या पश्चात जनतेला फायदा झाला पाहिजे, हा या कायद्याचा हेतू आहे. अमेरिकन सरकारचा हा कायदा मला न्याय्य वाटतो”, असं पित्रोदा यांनी म्हटलं आहे.
पित्रोदा एवढ्यावरच थांबले नाहीत. “भारतात असा कोणता कायदा नाही. त्यामुळे एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याची संपत्ती लोकांना मिळत नाही, मुलांना मिळते, असे म्हटले आहे. जेव्हा संपत्तीच्या पुनर्वाटपाची चर्चा होते, तेव्हा आम्ही नव्या धोरणांचा विचार करतो, ज्याचा फायदा गरीबांना होईल,” पित्रोदा यांच्या या वक्तव्याचा विरोधकांनी चांगलाच समाचार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “काँग्रेसची रॉयल फॅमिली आणि त्यांच्या प्रिन्सचे सल्लागार आधी म्हणाले होते कि भारतातील मध्यम वर्गावर अधिक कर लादला पाहिजे. आता ते म्हणतायत वारसा कर लागू करणार. तुम्ही आयुष्यभर तुमच्या मुलं-बाळांसाठी कमावलेल्या संपत्तीवर यांचा डोळा आहे.”

दरम्यान, हा वाद विकोपाला गेल्यावर सॅम पित्रोदांनी आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या विधानाचा गैरअर्थ काढल्याचे स्पष्टीकरण एक्सवर देताना पित्रोदा म्हणाले, “पंतप्रधान काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा अपप्रचार करत आहेत, हे लोकांच्या लक्षात आले आहे. आता त्यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढला जातोय.”

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img