26.6 C
New York

Daily Horoscope : आजचा आपला दिवस कसा असेल? जाणून घ्या.

Published:

विनायक करंदीकर

दिनांक : २४ एप्रिल २०२४
शके १९४६
मराठी महिना : चैत्र
सूर्योदय : सकाळी ०६. १४
सूर्यास्त : सायंकाळी ६.५८
वार : बुधवार
तिथी : प्रथमा
नक्षत्र : स्वाती
योग : सिद्धी
राहू काल : दु. १२.३६ ते २. ११

मेष

आजचा दिवस प्रवास, अभ्यास आणि आरोग्याची काळजी घेण्याचा आहे.
या गोष्टींवरच आज तुमचा खिसा रिकामा होईल.
तुमचा प्रवास कुटुंबातील व्यक्तींसह होईल.
माध्यम, पर्यटन किंवा शिक्षण क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस चांगला जाईल.
काही जणांना कानाचा, खोकल्याचा त्रास होईल.
शुभ अंक – ३
शुभ रंग – पिवळा

वृषभ

आज तुमचा नफा / तोट्याचा दिवस आहे.
आज तुमचा खर्च प्रवास, करमणूक आणि आरोग्य यावर होईल.
वैद्यकीय, करमणूक आणि सुरक्षा यंत्रणांच्या क्षेत्रात असणाऱ्या व्यक्तींना आजचा दिवस चांगला जाईल.
घरातील कोणीतरी आजारी पडेल. काहीजणांचे पायाचे दुखणे डोके वर काढेल.
काहींना डोळ्याचा, दातदुखीचा किंवा पाठीच्या दुखण्याचा त्रास संभवतो.
शुभ अंक – ८ शुभ रंग – निळा.

मिथुन

आजचा दिवस अभ्यास/कामावर लक्ष केंद्रित करण्याचा आहे.
व्यवसाय/पती/पत्नी/घर/वाहन/शिक्षण यासाठी खर्च होईल.
रियल इस्टेट, वाहन, शिक्षण, माध्यम क्षेत्रातील लोकांना फायदा होईल.
कुटुंबासाठी वेळ काढू शकणार नाही.
काही लोकांना गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो.
शुभ अंक : ८
शुभ रंग : काळा

कर्क
आजचा दिवस प्रवास, आरोग्याची काळजी घेण्याचा आहे.
वैद्यकीय, पर्यटन, शिक्षण, धार्मिक क्षेत्रातील लोकांना यश मिळेल.
आज तब्बेत थोडी नरम गरम राहील.
काही लोकांना गुडघेदुखी, कानदुखीचा त्रास होऊ शकतो.
शुभ अंक : ३
शुभ रंग : भगवा

सिंह
आज नुकसानीचा दिवस आहे. नियोजन करा, शहाणपणाने निर्णय घ्या.
गूढ, धार्मिक, कला, मनोरंजन क्षेत्रातील लोकांना यश मिळेल.
कुटुंबात वादाचे प्रसंग उदभवतील.
काही लोकांना पाठ, स्नायू दुखीचे, डोळ्यांचे त्रास होऊ शकतात
शुभ अंक : ९
शुभ रंग: लाल

कन्या
आजचा दिवस व्यवसायासाठी चांगला आहे.
माध्यम, मार्केटिंग, जाहिरात क्षेत्रातील लोकांना फायदा होईल.
कुटुंबात आनंदी वेळ घालवाल.
काही लोकांना सर्दी, खोकल्याचा, अंगदुखीचा त्रास होऊ शकतो
शुभ अंक : ६
शुभ रंग: गुलाबी

तूळ
आजचा दिवस प्रवास, आरोग्याची काळजी घेण्याचा आहे.
वैद्यकीय, माध्यम, पर्यटन क्षेत्रातील लोकांना फायदा होईल.
कुटुंबातील सदस्यांसह प्रवास दर्शवितो.
काही लोकांना कान, खांदे, पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
शुभ अंक : ५
शुभ रंग : हिरवा

वृश्चिक
आजचा दिवस प्रवासाचा आनंद घेण्याचा आहे.
कला, मनोरंजन, वैद्यकीय, विमा, माध्यम क्षेत्रातील लोकांना यश.
कुटुंबातील सदस्यांसह मौजमजा लुटाल.
काही लोकांना पाठदुखी, दातदुखीचा त्रास होऊ शकतो.
शुभ अंक : २
शुभ रंग: पांढरा

धनु
आजचा दिवस अभ्यास, व्यवसायासाठी चांगला आहे.
शिक्षण, घर, वाहन यावर खर्च होईल.
मालमत्ता, वाहन, शिक्षण, दळणवळण क्षेत्रातील लोकांना यश मिळेल.
कौटुंबिक वादाचे संकेत आहेत.
काही लोकांना पाठदुखी, दमा, खोकला होऊ शकतो.
शुभ अंक : १
शुभ रंग: सोनेरी

मकर
तुमच्यासाठी आजचा दिवस अभ्यास, प्रवास, गुंतवणुकीचा आहे.
शिक्षण, वैद्यकीय, माध्यम, पर्यटन क्षेत्रातील लोकांना फायदा होईल.
तब्येतीच्या तक्रारी उदभवतील.
काही लोकांना दमा, कान, पायदुखीचा त्रास होऊ शकतो.
शुभ अंक : ५
शुभ रंग : हिरवा

कुंभ
आजचा दिवस कामाचा, कमाईचा आहे.
वैद्यकीय, माध्यम, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील लोकांना यश मिळेल.
कुटुंबाला वेळ द्याल.
काही लोकांना पाठदुखी, डोळेदुखीचा त्रास होऊ शकतो.
शुभ अंक : ६
शुभ रंग: गुलाबी

मीन
आज कमाई करण्याचा दिवस आहे
माध्यम, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील लोकांना फायदा होईल.
कुटुंबात एकत्र येऊन आनंदात वेळ घालवाल.
काही लोकांना कंबरदुखी, खोकल्याचा त्रास होऊ शकतो.
भाग्यवान क्रमांक: ९
शुभ रंग: लाल

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img