सध्या उष्णतेमुळे चिकिनपॉक्स (Chicken Pox) म्हणजे कांजण्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. कांजण्या हा एक संसर्गजन्य आजार आहे. ज्यामुळे खाज सुटणे किंवा फोडासारखे त्वचेवर पुरळ येतात. व्हेरिसेला-झोस्टर नावाचा विषाणू त्याला कारणीभूत ठरतो. चिकनपॉक्स अत्यंत संसर्गजन्य आहे. त्याच प्रमाण देखील कमी झालं होत. परंतु, सध्याच्या उष्णतेमुळे त्याच प्रमाण वाढलेलं आहे.
लहान मुलांना कांजण्या होण्याची सर्वाधिक शक्यता असते. पण कांजण्या प्रौढ लोकांना देखील होऊ शकतात. १९९५ मध्ये कांजण्यांविरूद्धची पहिली लस उपलब्ध होण्यापूर्वी, जवळजवळ प्रत्येक लहान मुलांना कांजण्या यायच्या. १९९० मध्ये कांजण्यांचे प्रमाण जवळपास 90% ने कमी झाले. परंतु, वाढत्या उष्ण हवामानामुळे कांजण्याचे प्रमाण वाढलेले आहे. एकदा कांजण्या झाल्या की पुन्हा त्या होत नाहीत.
कांजण्यांचे तीन टप्पे
स्टेज 1: लाल आणि खडबडीत पुरळ येतात. हे काही दिवस टिकू शकते.
स्टेज 2: हा द्रवाने भरलेला फोड असलेला पुरळ असतो. साधारण एक ते दोन दिवसांनी फोड फुटतात.
स्टेज 3: जेव्हा फोड फुटतात, हा टप्पाही काही दिवस टिकतो.
पुरळ तीन टप्प्यांतून जात असले तरी, तुम्हाला एकाच वेळी सर्व प्रकारचे अडथळे येऊ शकतात. संपूर्ण पुरळ सुमारे 10 दिवस टिकू शकते.
साधारणतः आधी चेहरा आणि मानेवर कांजण्या पहिले दिसतात आणि मग संपूर्ण अंगावर पसरतात. कांजण्यापासून संरक्षण करण्यासाठी काही उपयुक्त उपाय आहे. संक्रमित लोकांपासून योग्य अंतर राखण्याचा सल्ला दिला जातो. वेळोवेळी हात स्वच्छ धुतले पाहिजे.