23.1 C
New York

Bachchu Kadu : अमरावतीत हिंदू -मुस्लिम दंगल घडू शकते, बच्चू कडूंचा खळबळजनक दावा

Published:

अमरावती

अमरावती लोकसभा (Amravati Loksabha) मतदारसंघात प्रचार सभेच्या जागेवरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) पुन्हा एकदा आमने-सामने आले आहे. बच्चू कडू यांनी रितसर पैसे भरून परवानगी घेत अमरावतीतील (Amravati) सायन्सकोर मैदान बूक केले होते. मात्र प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर या सभेवर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या करिता प्रचार सभा करिता बच्चू कडू यांची परवानगी रद्द करण्यात आल्याने बच्चू कडू आक्रमक झाले आहे.

बच्चू कडू म्हणाले की, हिंदू-मुस्लिम दंगल घडू शकते. अशा खालच्या पातळीवर येऊन त्यांची निवडणूक जिंकण्याची सवय आहे. त्यामुळे आम्ही दोन पावलं मागे घेतली. आमच्या कार्यकर्त्यांनीही त्याला पाठिंबा दिला. रात्रीच्या रात्रीत 20 ते 25 हजार कार्यकर्ते आले असते. पण आम्ही माघार घेतली असे बच्चू कडू म्हणाले.

बच्चू कडू म्हणाले की, आम्हाला 23 आणि 24 एप्रिलसाठी मैदानाची परवानगी मिळाली होती. पण आमचा प्रचार पोलिसांनी अडवला. ज्या पोलीस आयुक्तांनी आमचा प्रचार अडवला ते स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आहेत. आधी आम्हाला सांगितले की तुम्हाला परवानगी आहे. त्यानंतर 23 तारखेला संध्याकाळी 7 वाजता आम्हाला सांगितलं की, तुम्हाला परवानगी नाही. जर कायद्याचे पालन तुम्हालाच करायचे नसेल तर तुम्ही कशाला निवडणूक ठेवली, पोलीस आयुक्तांपासून कलेक्टर सर्वांनी आमचा प्रचार थांबवला. मग बटण सुद्धा त्यांनीच दाबावं अशी टीकाही बच्चू कडू यांनी केला.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये अमरावतीत मतदार होणार आहे दुसऱ्या टप्प्यात होत असलेल्या निवडणुकीच्या आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून सभेचा धडाका सुरू आहे मात्र नवनीत राणा यांच्या समर्थनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होत आहे त्याकरिता बच्चू कडू यांच्या सभेची परवानगी रद्द केल्याने अमरावती शहरात बच्चू कडू विरुद्ध रवी राणा हा संघर्ष पुन्हा भेटण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img