3.6 C
New York

Amir Khan: पुरस्कार सोहळ्यांना का जात नाहीस? आमिरने सोडलं मौन!

Published:

बॉलीवूडचा अभिनेता मिस्टर परफेक्शनिस्ट अमीर खान (Amir Khan). आमिर खान सहसा कुठल्या रिऍलिटी शोमध्ये पाहायला मिळत नाही. पण कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन शो’ मध्ये अमीर झळकला आहे. आजपर्यंत कपिल शर्माच्या शोमध्ये अनेक सेलेब्रिटीएस सहभागी झाले होते. त्यातच आमिर खानने पहिल्यांदाच हजेरी लावली आहे.

या शोमध्ये आमिरला अनेक प्रश्न विचारले त्यातच तो पुरस्कार सोहळ्यांना का जात नाही असा प्रश्न विचारला. त्यावर आमिरने मौन सोडलं आहे. हा प्रश्न अर्चना पुरन सिंगने आमिरला विचारला कि तू पुरस्कार सोहळ्यांना का जात नाहीस? याशिवाय तुला मिळालेल्या पुरस्कार सोहळ्यांना सुद्धा जात नाहीस!

यावर आमिरने एक गमतीशीर उत्तर दिलं आहे, तो म्हणाला,’ तुमचा वेळ अतिशय मौल्यवान आहे, त्याच योग्य ठिकाणी वापर केला पाहिजे.’ या नवीन शोचा भाग २७ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे. ‘अलीबाबा’ त्याचसोबत ‘टाईम मशीन’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सध्या अमीर व्यस्त आहे. मुलीच्या लग्नाच्या वेळीस अमीर प्रचंड चर्चेत आला होता.


आमिरचा २०२१ मध्ये किरण रावसोबत घटस्फोट झाला. १५ वर्षाच्या नात्यानंतर त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. नुकताच पार पडलेल्या इरा खानच्या लग्नात सर्व सह कुटुंबं उपस्थित होते. त्यावेळी आमिर आणि किरण देखील सोबत होते. साधेपानात साजरा केलेल्या या लग्नाला चाहत्यांनकडून चांगलीच पसंती मिळाली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img