23.1 C
New York

Amethi, Raebareli Loksabha : काँग्रेसचं ठरलं! अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियांका

Published:

नवी दिल्ली
काँग्रेसचे पारंपरिक बालेकिल्ले असलेले उत्तर प्रदेशातील अमेठी (Amethi) आणि रायबरेलीतून (Raebareli) कोण निवडणूक लढणार, याचा सस्पेन्स आता संपला आहे. काँग्रेसने मतदारांचा अंतर्गत कौल जाणून घेऊन येथून उमेदवार कोण द्यायचा, याचा निर्णय घेतला आहे. अमेठीतून राहुल गांधी (Rahul Gandhi) तर रायबरेलीतून प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) निवडणूक लढवतील, असे सूत्रांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर याची अधिकृत घोषणा होईल, असे सांगण्यात आले.
राहुल गांधी केरळच्या वायनाड मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. तेथे दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला मतदान होत आहे. अमेठी आणि रायबरेलीचे मतदान पाचव्या टप्प्यात आहे. तेथे उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत ३ मेपर्यंत आहे. तर २० मी रोजी मतदान होणार आहे. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमेठी आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघांचे काँग्रेसने अंतर्गत सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणाच्या आधारे अमेठीतून राहुल गांधी तर रायबरेलीतून प्रियांका गांधी यांना अनुकूल वातावरण असल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार पक्षाने राहुल आणि प्रियांका यांच्या उमेदवारीचा निर्णय घेतला आहे.
पंचायत स्तरावर केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात गांधी परिवाराबाबत मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद दिसून आला आहे. अमेठीत २०१९ ला भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला होता. पण, यावेळी मतदारांमध्ये इराणी यांच्याविषयी नाराजी आहे. याचा फायदा राहुल गांधी यांना होऊ शकतो. शिवाय अमेठी आणि रायबरेली हे दोन्ही मतदारसंघ गांधी घराण्याचे पारंपरिक मतदारसंघ आहेत. तेथून गांधी घराण्यातील व्यक्तीनेच निवडणूक लढवावी, असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनादेखील वाटते. अन्य उमेदवार दिल्यास काँग्रेसला येथे पराभवाला सामोरे जावे लागू शकते, असेही या अहवालात म्हटले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img