8.9 C
New York

Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या फोटोला डोंबिवलीत युवासेनेकडून जोडे मारो आंदोलन

Published:

शंकर जाधव, डोंबिवली

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्त्यव्य केल्याचा निषेध करत डोंबिवलीत शिवसेना डोंबिवली (Dombivli Yuva Sena) मध्यवर्ती शाखेसमोर आदित्य ठाकरे यांच्या व्यंगचित्राच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन (protest) केले.

युवासेना जिल्हा सचिव राहुल म्हात्रे, डोंबिवली शहर अध्यक्ष सागर जेधे, उत्तर महाराष्ट्र निरीक्षक अभिषेक चौधरी, शहर समन्व्यक दिलीप सामंत, उपशहर अध्यक्ष ओमकार कदम, परेश म्हात्रे , अर्जुन माने , विभाग अध्यक्ष करण कोतवाल, राहुल कदम, अर्चित कठोतकर यांसह अनेक युवासैनिक उपस्थित होते.यावेळी युवासेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांच्या व्यंगचित्राच्या पोस्टरला जोडे मारले.

यावेळी युवासेना जिल्हा सचिव राहुल म्हात्रे म्हणाले, टोमणे मारणाऱ्या वडिलांकडून मुलांच्या आक्षेपार्ह वक्त्यव्य केल्याचा आम्ही युवासेनेकडून निषेध करत आम्ही करत आदूच्या व्यंगचित्राच्या पोस्टरला जोडे मारले आहेत. कोरोना काळात आदु घरी आराम करत होता आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जनतेच्या सेवेसाठी दिवसरात्र काम करत होते. टोमणेसम्राट वडिलांच्या पाऊलापाऊल टाकत बोलत आहे, मात्र आजोबांचे संस्कार व विचार विसरले आहेत. आदूसाठी युवासेना पुरेशी असून आम्ही काकडुन निषेध करतो.

तर शहर अध्यक्ष सागर जेधे म्हणाले, जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आदूबाळाने जनतेसाठी काहीही केले नाही. काम करणाऱ्या शिवसैनिकांच्या गळ्यावर पाय ठेऊन पुढे जात आहे. शिल्लक सेना आदूच्या आशा वक्तव्यामुळे संपेल. ही लोक राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. यांनी बाळासाहेबांचे विचार मातीमोल केले आहे.

अभिषेक चौधरी म्हणाले, आदित्य यांनी जो नीच शब्द वापरला तो त्याचाच घोटाळ्यातील आहे. मृतांच्या टाळूवरच लोणी खाणारी ही टोळी आणि हे दुसऱ्यांना असे शब्द वापरतात. लोकांना त्रास दिलेला आहे, त्यांनी हे जे शब्द वापले ते कोणालाच रुचलेले नाहीत.

उत्तर महाराष्ट्र निरीक्षक अभिषेक चौधरी म्हणाले, आदित्य यांनी जो शब्द वापरला तो त्याचाच घोटाळ्यातील आहे. मृतांच्या टाळूवरच लोणी खाणारी ही टोळी आणि हे दुसऱ्यांना असे शब्द वापरतात. लोकांना त्रास दिलेला आहे, त्यांनी हे जे शब्द वापले ते कोणालाच रुचलेले नाहीत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img