11.6 C
New York

Yashraj Films: सुप्रीम कोर्टाचा यशराज फिल्म्सला दिलासा; नेमकं प्रकरण काय?

Published:

सुप्रीम कोर्टाने यशराज फिल्मसला (Yashraj Films) मोठा दिलासा दिला आहे. २०२१ मध्ये यशराज फिल्म्स विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण (NCDRC) आयोगाने दिलेल्या आदेशाला यशराज फिल्म्सने आव्हान दिले आहे. यावर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. न्या. पी.एस. नरसिंह आणि न्या. अरविंद कुमार यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.

चित्रपट ‘फॅन’ मध्ये ‘जबरा फॅन’ हे गाणे न ठेवल्याने याचिका दाखल केली होती. हा चित्रपट यशराज फिल्मचा होता. त्यामुळे गाणं न ठेवल्याने ग्राहकाला 15 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. आफरीन झैदी यांनी ट्रेलरमध्ये हे गाणे पाहूनच सहकुटुंब हा चित्रपट पाहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सगळ्या चित्रपटात हे गाणंच दिसून आले नाही. याचिकेवर सुनावणी करताना चित्रपट प्रमोशनमुळे ग्राहक आणि सेवा पुरवठादार यांच्यात काही संबंध आहेत का? एखादा प्रमोशनल कंटेट हटवल्यानंतर एखाद्याला नुकसानभरपाईचा अधिकार मिळेल का? या मुद्यांवर भर दिला.

व्यवसायाने शिक्षक असलेल्या ग्राहक आफरीन फातिमा झैदी यांनी ‘जबरा फॅन’ या गाण्याचा प्रोमो पाहिल्यानंतर ‘फॅन’ हा चित्रपट तिच्या कुटुंबासह पाहिला तेव्हा हे गाणे चित्रपटात नसल्याचे त्यांना समजले. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ आणि तक्रारदाराला नोटीस बजावून आयोगाच्या आदेशाला स्थगिती दिली होती. झैदी यांनी नुकसानभरपाईची मागणी करताना जबरा फॅन हे गाणे चित्रपटात नसल्याच्या डिसक्लेमरसह प्रोमो टेलिकास्ट करण्याची मागणी केली होती.

मात्र, आता सुप्रीम कोर्टाने यशराज फिल्म्सला दिलासा दिला आहे. प्रोडक्शन हाऊसने चित्रपट रिलीज होण्या आधीच चित्रपटात हे गाणं नसल्याची माहिती दिली होती. महाराष्ट्र ग्राहक तक्रार निवारण आयोगाने 2017 मध्ये झैदी यांच्या बाजूने निर्णय सुनावला. सुप्रीम कोर्टने यशराज फिल्मसला मोठा दिलासा दिला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img