3.6 C
New York

Shahid Kapoor: शाहीद कपूरचा पारा चढला, कारण?

Published:

बॉलीवूड अभिनेता शाहीद कपूर (Shahid Kapoor) सोमवारी रात्री पत्नी मीरा राजपूतसोबत डिनर डेटला गेला होता. त्यावेळीस ते दोघेही शांततेने बाहेर पडत होते. मात्र, पापाराझीने दोघांचे फोटो काढून आणि प्रश्न विचारून शांतता भंग केली आहे. शाहीद आणि मीराचा हॉटेलपासून ते गाडीपर्यंत पापाराझीनी पाठलाग केला. यावर शाहीदने संतप्त होऊन पापाराझीवर चिडला.

त्यामुळे सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात स्पष्टपणे अभिनेता शाहीद पापाराझींवर चिडलेला दिसत आहे. आता व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, शाहीद चिडलेला दिसतो कारण पापाराझीं आणि स्थानिक लोक त्याचा पाठलाग करत आहेत. एका क्षणाला त्याने त्यांना फटकारले देखील असे दृश्य त्यात दिसत आहेत. शाहीद पापाराझी आणि स्थानिक लोक पाठलाग करू नका आणि थांबण्याची विनंती करत आहे. यासोबत त्यांना सभ्यतेने वागा असे सांगत आहे.

सदर व्हिडिओ व्हायरल होताच, नेटकऱ्यांनी मात्र शाहीदला बोध सुनावले आहेत. पापाराझीसोबत केलेल्या गैरवर्तनाबदल नेटकऱ्यांनी म्हंटले आहे. पोज देण्याची उच्च नसताना देखील पापाराझींना हॉटेलच्या पत्त्यावर बोलवल्याबद्दल शाहीदला चांगलंच ट्रोल केलं आहे.


शाहीदच पापाराझीसोबत पहिलच गैरवर्तन नाही आहे. तर त्याने अनेकदा असं वागल्याचा दावा आहे. शाहीद सध्या त्याच्या रिलीजच्या आनंदात आहे , तेरी बातों में ऐसा उल्झा जिया, ज्याने बॉक्स ऑफिसवर आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. या चित्रपटाच्या यशाचा आनंद शाहीद लुटत आहे. तो आता त्याच्या आगामी ‘देवा’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, ज्यामध्ये तो एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img