26.6 C
New York

Hardik Pandya : सेहवागने केली पांड्याची पाठराखण ; रोहीत शर्माला तरी कुठे जमले ?

Published:

मुंबई इंडियन्स यावर्षीच्या सत्रामध्ये त्यांच्या खेळापेक्षा इतर गोष्टींमुळे चर्चेमध्ये राहिल्याचं पाहायला मिळत आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) कर्णधार झाल्यापासून या संघाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली होती. यामध्येच आता भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागची प्रतिक्रिया समोर आली आहे.
“हार्दिक पांड्यावर स्वतःच्या अपेक्षांचा दबाव असू शकतो. पण गेल्या वर्षीही मुंबई इंडियन्सची अशीच परिस्थिती होती. त्याआधीही रोहित शर्मा कर्णधार होता. कर्णधार म्हणून त्याने धावा केल्या नाहीत. रोहित शर्माला दोन-तीन वर्षांत कर्णधार म्हणून एकही विजेतेपद मिळालेले नाही. मुंबई इंडियन्सला माहीत आहे की, यापूर्वीही असेच होते. जर त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील आणि त्याला विकेट मिळत नसेल, धाव होत नसतील त्याच्या नेतृत्वाखाली संघ पराभूत होत असेल तर ते चुकीचे आहे.” असे वीरेंद्र सेहवागने म्हणत एक प्रकारे हार्दिक पांड्याची पाठराखणच केली आहे. मुंबई इंडियन्सने शेवटचे विजेतेपद २०२० मध्ये जिंकले होते.

मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सकडून हार्दिक पांड्याला विकत घेत नेतृत्वही सोपवले. मात्र आता त्याची कामगिरी पाहून समीक्षकांना ताशेरे ओढायला आयता वाव मिळाला आहे. इतकंच काय, मैदानात प्रेक्षक देखील पांड्याला वारंवार त्रास देत आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली 8 पैकी फक्त 3 सामने जिंकता आले असून मुंबईचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. हार्दिक पांड्याने 8 सामन्यात 21.57 च्या सरासरीने 151 धावा केल्या आहेत.
मुंबई इंडियन्सचे अजून 6 सामने बाकी आहेत. या सहापैकी पाच सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील. शिवाय नेट रन रेट सकारात्मक ठेवणे आवश्यक आहे. सहापैकी सहा सामने जिंकल्यास प्लेऑफमधील स्थान निश्चित होईल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img