23.1 C
New York

Mantralay : मंत्रालयातील शालेय शिक्षण विभागाला ‘धक्का’ ,’एवढ्या’ लाख रुपयांना ठकवले

Published:

मुंबई

मंत्रालयातून (Mantralay) एक धक्कादायक बातमी आली असून शालेय शिक्षण विभागातून (Department of School Education, Maharashtra) तब्बल ४७ लाख ६० हजार रुपयांची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. देशभरात निवडणुकीची (Loksabha Election) धामधूम सुरु असतानाच दुसरीकडे हा प्रकार समोर आला आहे. आरोपींनी शालेय शिक्षण विभागातून बनावट चेक, बनावट स्टॅम्प, आणि स्वाक्षरीद्वारे चार टप्प्यात ४७ लाख ६० हजार रुपये काढल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई मंत्रालयातील हि गेल्या महिन्यभारातील दुसरी घटना असून याआधी पर्यटन विभागातून (Department of Tourism, Maharashtra) ६७ लाख रुपये गायब झाले होते.

शालेय शिक्षण विभागातून बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरीद्वारे एकूण चार टप्प्यात ४७ लाख ६० हजार काढल्याची बातमी समोर आली आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात चार जणांवर कलाम ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४७१, ४७३, ३४ भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून काढण्यात आलेले पैसे नमिता बाग, प्रमोद सिंग, तप कुमार आणि झीनत खातून यांच्या खात्यावर हि रक्कम जमा करण्यात आल्याचे तपासातून समोर आले आहे. याबाबत पोलीस अधिक चौकशी करत असून यामागचा मास्टरमाइंड कोण? याचा शोध पोलीस घेतायत.

याअगोदरही पर्यटन विभागाच्या खात्यातून पैसे चोरीला गेल्याची घटना समोर आली होती. पर्यटन विभागाच्या खात्यातून ६७ लाख चोरीला गेले होते. याचा तपास मरीन लाईन्स पोलीस करत आहेत. पोलिसांनी केलेल्या तपासातून चोरीला गेलेली रक्कम ज्या बँक खात्यात जमा झालेली आहे, ती सर्व खाती कोलकाता शहरातील आहेत. महिनाभरातील ही दुसरी घटना असून मंत्रालयातील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवडणुकीच्या धामधुमीत शासनाचे लक्ष विभागांकडे आहे कि नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री कार्यालयात त्यांच्या लेटरहेडवर बनावट स्वाक्षरी आणि बनावट स्टॅम्पचा वापर केला गेल्याचा प्रकार काही महिन्यापूर्वी घडला होता. हे प्रकरण ताजे असतानाच शिवसेनेचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विभागात बनावट स्वाक्षरी आणि बनावट स्टॅम्पचा वापर करून लाखो रुपये लुटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img