मुंबई
सूरतमध्ये (Surat Lok Sabha Election) भाजपाचे (BJP) लोकसभेचे (Lok Sabha Elections) उमेदवार मुकेश दलाल (Mukesh Dalal) हे बिनविरोध निवडून आल्यानं नवा वादंग निर्माण झालेला आहे. विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी यावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे.
सूरतचे काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभोणी यांनी भाजपाशी हातमिळवणी केल्याचं समोर आलंय. भाजपाकून मिळालेल्या निर्देशानुसार कुंभोणी यांनी प्रदेश काँग्रेसला अंधारात ठेवत पावलं उचलली, त्यामुळं त्यांचा उमेदवारी अर्ज बादल झाल्याचं सांगण्यात येतंय. कुंभोणी यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जात अनुमोदक म्हणून कार्यकर्ते आणि नेत्यांच्या नावांऐवजी नातेवाईक आणि नीकटवर्तीयांची नावं दिल्याचं समोर आलंय. यानंतर मतदारसंघआतील 8 अपक्षांनीही त्यांचे अर्ज मागे घेतल्यानं भाजपाचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. या सगळ्यानंतर असे प्रकार लोकशाहीला धोका असल्याचं काँग्रेस नेते सांगतायेत.
निवडणूक बिनविरोध होण्यास विरोध
लोकशाहीसाठी कोणतीही निवडणूक बिनविरोध होणे घातक आहे, त्यातच आज सुरत लोकसभेच्या निवडणूकीत ज्या पध्दतीने भाजपा उमेदवार बिनविरोध निवडून आलाय तो चिंताजनक विषय आहे, अशा पध्दतीच्या राजकारणाचा निषेध करावा तितका थोडा आहे.अशी प्रतिक्रिया सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.