23.1 C
New York

Sanjay Raut : संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल. म्हणाले…

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Elections) पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोप सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) गंभीर आरोप केले होते. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात आरोपी होते. त्यांच्याविरोधात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारने तपास सुरु केला होता. त्यामुळेच अटकेच्या भीतीने फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंवर दबाव आणून सरकार पाडल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे. पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी भाजपाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांविरोधात वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तपास सुरु होता असं सांगताना कारवाईच्या भीतीला घाबरुनच फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकनाथ शिंदेंवर अटकेचा दबाव टाकत आमदार फोडल्याचा आरोप केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीतील नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांचे नाव होते. या प्रकरणात मुंबई सायबर पोलिसांच्या वतीने गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात फडणवीस यांना अटकेची भीती सातवत होती, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, सध्याचे मुख्यमंत्री असे सांगत आहेत की, ते ज्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये होते, त्या सरकारकडून कारवाई करण्यात येणार होती. त्यांनी आपल्या मुलाखतीत फडणवीस, शेलार, दरेकर, महाजन आणि लाड यांची नावे घेतली. पण, भाजप नेत्यांना कायदा लागू होत नाही का? असा पहिला प्रश्न राऊतांकडून उपस्थित करण्यात आला.

संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांचे फोन टॅप केल्याचा आरोप होता. अत्यंत बेकायदेशीरपणे, चोरून त्यांनी विरोधकांचे फोन ऐकण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस यांच्या हुकूमावरून विरोधकांवर पाळत ठेवण्यात आली. त्या प्रकरणाची चौकशी सुरू होती, गुन्हे दाखल झाले. यानंतर याप्रकरणी आपल्याला अटक होऊन शिक्षा होईल, या भीतीतून फडणवीस तडतड करू लागले.

संजय राऊत म्हणाले की, आपल्याला अटक होईल या भयातून फडणवीसांनी शिंदेंवर दबाव आणला. शिंदेंना अटकेची भीती दाखवली. स्वत:ची अटक टाळण्यासाठी, बचाव करण्यासाठी त्यांनी पक्ष फोडले आणि उद्धव ठाकरेंचे सरकार पाडले, असा आरोप खासदार संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता 4 जूननंतर देशातील सरकार 100 टक्के बदलणार आहे. ज्यानंतर आम्ही सत्तेत आल्यावर पुन्हा एकदा त्या चौकशा सुरू करू, असा इशाराच राऊतांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img