बॉलीवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आला आहे. त्याच्या वांद्रे निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर सिनेसृष्टी हादरून गेली आहे. रविवारी १४ एप्रिल रोजी पहाटे दोन अज्ञात व्यक्तींनी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार केला. स्थानिक पोलिसांनी प्राथमिक तपास केल्यानंतर रविवारी रात्री हे प्रकरण मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. पोलीस अधिकारी सध्या संशयितांची चौकशी करत आहेत.
त्यातच त्यांनी २ आरोपींना पकडलेलं आहे. त्यांची नावे विकी गुप्ता आणि सागर कुमार आहे. गोळीबाराच्या घटनेवर सलमानने अद्याप सार्वजनिकपणे प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांनी कोणतीही सोशल मीडिया पोस्ट किंवा विधान देखील शेअर केलेले नाही. सलमानला गोळीबाराच्या घटनेकडे लक्ष द्यायचे नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ईदच्या दिवशी सलमान खानच्या पनवेलमधील फार्महाऊसवर हल्लेखोरांनी हल्ल्याची योजना आखल्याचा संशय आहे.
मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानचे कुटुंबीय अनेकदा सण साजरे करण्यासाठी किंवा धम्माल मस्ती करण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत येतात. त्याचमुळे मुंबई पोलिसांचा संशय त्यांनी ईदच्या दिवशी हल्ल्याचा कट रचल्याचा आहे. अभिनेत्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर हल्ला करणाऱ्या विकी आणि सागरने सलमानच्या पनवेलमधील फार्महाऊसजवळ असलेल्या हरिग्राम गावात घर भाड्याने घेतले होते. त्यासोबतच हल्ल्यावेळी वापरलेली बाईकही त्यांनी पनवेलमध्येच विकत घेतली होती. गोळीबार केल्यानंतर आरोपी गुजरातमध्ये पळून गेले होते. त्या ठिकाणाहून विकी सागर पलकला पोलिसांनी अटक केली होती. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या आदेशावर त्यांनी हल्ला केला आहे.