26.6 C
New York

Protein Food: भारतीय पदार्थामध्ये ‘हे’ आहेत प्रोटीनयुक्त पदार्थ! जाणून घ्या…

Published:

प्रोटीन (Protein Food) हा आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि शरीरासाठी मूलभूत बिल्डिंग ब्लॉक म्हणून काम करतो. प्रोटीन हा मानवी शरीराचा बिल्डिंग ब्लॉक मानला जातो. शक्ती मिळविण्यासाठी शरीराला प्रोटीनयुक्त अन्न आवश्यक आहे. वजन घटवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी प्रोटीनचा वापर केला जातो. आपल्या आहारात हे उच्च-प्रोटीन असलेले भारतीय पदार्थ समाविष्ट केल्याने शरीराला या महत्त्वपूर्ण पोषक तत्वांची पुरेशी मात्रा प्रदान करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. प्रोटीन समृध्द अन्नामुळे अनेक फायदे होऊ शकतात. शरीराची वाढ आणि विकास होण्यास मदत करते. हाडे आणि स्नायूंचा विकास होऊ शकतो. त्वचा, केस आणि नखे यांच्यासाठी संरक्षणात्मक स्तर तयार करते. रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी जस की अँटीबॉडीज, जे शरीराला अनेक संक्रमणांपासून संरक्षण देतात, ते प्रोटीनमुळे बनलेले असतात. प्रोटीन शरीराच्या विविध भागांमध्ये ऑक्सिजन पुरवण्यास मदत होते.
अनेक भारतीय पद्धतीचे पदार्थ खाल्ल्याने प्रोटीन मिळवण्यास फायदा होऊ शकतो. मानवाला त्यांच्या आयुष्यभरासाठी प्रोटीनयुक्त आहाराची गरज असते.

1) मसूर किंवा डाळ
अरहर, उडीद किंवा मूग डाळ असो, भारतीय डाळींशिवाय राहू शकत नाहीत. मसूर, जवळजवळ प्रत्येक जेवणाचा एक भाग आहे. प्रोटीन, फायबर आणि महत्त्वपूर्ण पोषक तत्त्वांमुळे आपल्या आहारात याचा वापर करावा.


२) हिरवे वाटाणे किंवा मटर
हिवाळ्यातील प्रोटीनयुक्त भारतीय भाज्यांमध्ये मटरचा वापर करू शकता. तुमच्या प्रोटीनच प्रमाण वाढवण्यासाठी, मटर पनीर उत्तम पर्याय आहे.


3) सोयाबीन
सोयाबीनचा वापर भाजी, नास्ता, सॅलडमध्ये करू शकता. प्रोटीन रिच फूड भारतामध्ये शाकाहारी लोकांमध्ये लोकप्रिय आहेत.

4) चणे
चणे हे प्रोटीन पॉवरहाऊस मानले जाते. चणामध्ये प्रचंड प्रमाणात प्रोटीन असते जे निरोगी, मजबूत आणि तंदुरुस्त राहण्यास मदत करतात. चणे आणि शेंगा हे उच्च प्रोटीन असलेले भारतीय पदार्थ आहेत जे सॅलडमध्ये स्वादिष्ट लागतात.

6) भाज्या आणि फळे
भारतातील प्रोटीन समृद्ध भाज्यांमध्ये पालक, बटाटे, ब्रोकोली आणि शतावरी यांचा समावेश होतो. तसेच, उच्च प्रोटीन सामग्री असलेले रताळे भारतातील प्रोटीन समृद्ध भाज्यांमध्ये चांगले आहे. केळी, पेरू आणि काही बेरी या फळांमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img