7.3 C
New York

Parth Pawar : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवारांना राज्य सरकारकडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा

Published:

बारामती

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) राष्ट्रीय नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांना वाय प्लस सिक्युरिटी (Y+ Security) दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बारामती लोकसभा (Baramati LokSabha) मतदारसंघांमध्ये प्रचार सभा तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन ते मतदार संघातील नागरिकांसोबत संवाद साधत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पार्थ पवार यांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात सध्या होत असलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुरक्षा यंत्रणा कमी असल्याने राज्यातील अनेक लोकांना देण्यात आलेल्या सुरक्षा राज्य सरकारने निवडणुकीचे कारण देत काढण्यात आले होते. मात्र आता पार्थ पवार यांना झेड प्लस सिक्युरिटी देण्यात आल्याने विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. राज्यातील पोलीस दलामध्ये मनुष्यबळ कमी पडत असताना उपमुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवावर राज्य सरकार मेहरबान झाले आहे का अशा चर्चांना उधाण आलं आहे.

तर याआधी खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसापुर्वी पत्र लिहून युगेंद्र पवार आणि रोहित पवाराना सुरक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र, पार्थ पवारांना थेट वाय प्लस कॅटेगरीची सिक्युरिटी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img