26.6 C
New York

Nilesh Sable: हसताय ना? हसायलाच पाहिजे’, कसं सुचलं हे नाव! जाणून घ्या खास किस्सा…

Published:

झी मराठीवरील घराघरात पोचलेला कार्यक्रम म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’. लोकप्रिय निवेदक, अभिनेता , दिग्दर्शक निलेश साबळे (Nilesh Sable) यांनी ‘झी मराठी’वरील ‘चला हवा येऊ द्या’ मधून काही महिन्यांपूर्वी एक्झिट घेतली. त्यानंतर ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. गेली १० वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असलेल्या हा लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ऑफ एअर झाला.

पण आता निलेश साबळे, भाऊ कदम व ओंकार भोजनेसह महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा खळखळून हसवण्यासाठी येत आहेत. हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या नव्या कार्यक्रमातून विनोदाचे हे तीन हुकमी एक्के प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून हा नवा कार्यक्रम ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. या विनोदी कार्यक्रमाचं लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा म्हणजेच निलेश साबळे करणार आहे. हा कार्यक्रम २० एप्रिलपासून सुरू होणार असून दर शनिवार-रविवार रात्री ९ वाजता पाहायला मिळणार आहे.


या कार्यंक्रमाच नाव कस सुचलं हे विचारलं असता, निलेश म्हणाला केदार जोशींसोबत या बाबत चर्चा केली. त्यावेळी मी त्यांना माझ्या डोक्यात असलेली चार-पाच नाव दाखवली. मी आधी या नावांचे तुकडे केले होते. ‘द हसताय ना शो’ आणि ‘द हसायलाच पाहिजे शो’ अशी नावं ठरवून बघूया आता सरांना कोणतं आवडतंय या विचारात मी होतो.” यावर केदार सर म्हणाले आपण दोन्ही नाव एकत्र करूया. आणि मग कार्यक्रमाचं नाव ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ असा ठरल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img