23.1 C
New York

Mumbai-Pune Expressway : मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आज वाहतुकीसाठी 2 तास बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Published:

मुंबई

पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण महामार्ग (Mumbai-Pune Expressway) आज दोन तास बंद ठेवला जाणार आहे. रस्तेकामामुळे महामार्गावरील (MSRDC) वाहतूक दुपारी 12 ते 2 या काळात बंद ठेवण्यात येईल. पुणे एक्स्प्रेस वेच्या मुंबई वाहिनीवर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत वाहनांवर वॉच ठेवण्याकरिता सर्व्हिलन्स कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक असलेली गॅन्ट्री बसवण्यासाठी आज मंगळवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या बदलाची दखल घेत वाहनधारकांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केले आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर रस्त्याचे कामाकरिता विशेष ब्लॉक आज घेण्यात येणार आहे. विशेष ब्लॉक दुपारी 12 ते 2 या कालावधीत असणार आहे. या दरम्यान मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. या मार्गावरील लेनवर गॅन्ट्री बसवण्याचे काम सुरू असल्याने या मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मंगळवार, 23 एप्रिल 2024 रोजी दुपारी 12 ते 2 च्या दरम्यान यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुणे ते मुंबई या लेनवर गॅन्ट्री टाकण्याचे काम हाती घेणार आहे. परिणामी, सर्व हलकी व जड वाहनांना रस्त्यांवरून वाहतुकीसाठी बंदी असणार आहे. पर्यायी मार्गाने वाहतुकीला परवानगी दिली.पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहने जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने वळवण्यात येतील. या वाहनांना खोपोलीमार्गे जावे लागेल आणि शेडुंग टोल प्लाझा मार्गे मुंबईकडे वळवण्यात आले.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र येतात आणि खंडाळा बाहेर पडण्यासाठी वेगळे होतात. आडोशी बोगद्यापासून खंडाळा एक्झिटपर्यंतचा भाग हा 6 लेनचा रस्ता आहे परंतु या विभागात 10 लेन रस्त्याची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक आणि दरड कोसळल्याने कोंडी होते. या विभागात वेग कमी झाल्याने आणि प्रवासाचा वेळ वाढल्याने आणि वेळेची बचत करण्यासाठी उर्वरित द्रुतगती मार्गावर वाहने अधिक वेगाने जातात त्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.

खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्यूटपर्यंतच्या सध्याच्या मुंबई पुणे द्रुतगती मार्गाची लांबी 19 किलोमीटर आहे. या नवीन मिसिंग लिंकच्या बांधकामानंतर हे अंतर 13.3 किमी इतके कमी होईल. त्यामुळे, मुंबई ते पुणे एक्स्प्रेस वेची एकूण लांबी 6kms ने कमी होईल आणि प्रवासाचा वेळ 20-25 मिनिटांनी कमी होईल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img