26.6 C
New York

Leopard : ‘तो’ बिबट्या २५ दिवसांनी जेरबंद

Published:

वसई

वसईकरांची मागील पंचवीस दिवसांपासून झोप उडवणारा बिबट्या (Leopard) अखेर जेरबंद झाला आहे. किल्ल्यात आणि वसई (Vasai) शहरात दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला. मंगळवारी पहाटेच्या साडेतीनच्या सुमारास करण्यात वनविभागाला त्याला पकडण्यात यश आले. किल्ल्यातील एका खोल भुयारात गारव्यासाठी हा बिबट्या आश्रयाला गेला होता. भुयाराच्या तोंडावर लावलेल्या एका पिंजऱ्यात तो अलगत येऊन अडकला.
   
वसईच्या किल्ल्यात २९ मार्चला बिबट्या आढळून आला आल्यामुळे. वसई आणि आजूबाजूच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. बिबट्याचा भीतीने किल्ल्यावर पर्यटनास बंदी घालण्यात आली होती.

या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने किल्ल्यातील भागात ट्रॅप कॅमेरे, रेस्क्यू पथक तसेच पिंजरे लावले होते. त्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. 20 ते 25 दिवस उलटून गेले तरी या बिबट्याचा शोध लागला नव्हता. बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून सातत्याने पिंजरे बदलले जात होते. बिबट्या सापडत नसल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत होते. बिबट्याचा भीतीने संध्याकाळची वसई-भाईंदर रोरो सेवा देखील बंद करण्यात आली होती. मंगळवारी पहाटे अखेर हा बिबट्या भुयारा समोर लावलेल्या एका पिंजऱ्यात येऊन अडकला. २५ दिवसांनंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. मागील महिनाभरापासून भीतीच्या सावटाखाली असलेल्या वसई किल्ल्याच्या परिसरातील किल्ला बंदर, पाचूबंदर भागातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img