3.6 C
New York

Eggs: उन्हाळ्यात अंडी खाल्ल्याने होऊ शकतात ‘हे’ परिणाम…

Published:

उष्णतेचा प्रमाण वाढलेलं आहे. हायड्रेशन, UV rays पासून संरक्षण आणि योग्य डाएटमुळे उष्णतेचा परिणाम कमी होऊ शकतो. पण उन्हाळ्यात अंडी खाऊ शकतो का? अंडी (Eggs) हे सर्वात स्वादिष्ट पण पौष्टिक पदार्थ आहेत. अंडीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. जे शरीरासाठी योग्य आहे. पण उन्हाळाच्या दिवसात अधिक प्रमाणात अंडी खाल्ल्याने ते शरीरास त्रासदायक ठरू शकते. अंडी खाल्ल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, स्नायूंना ताकद देतात, संज्ञानात्मक आरोग्य सुधारण्यासाठी आणि वजन कमी करण्यात मदत करतात. परंतु उन्हाळ्यात अंडी खाणे सुरक्षित आहे का?


उष्ण आणि दमट हवामानात अंडी खाण्याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. उष्ण हवामानात अंडी खाल्ल्याने अस्वस्थ वाटू शकते किंवा पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत अंडीचे जास्त सेवन टाळणे चांगले आहे. खरं तर, अंड्याच्या पांढऱ्या भागात सर्वात जास्त प्रोटीन असते. पण उष्णतेच्या वातावरणात अंड्याचे सेवन केल्याने त्रास होऊ शकतो.

लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी अंड्यातील लोह महत्वाचे आहे. त्यामुळे प्रतिकारशक्ती सुधारते. अड्यांमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन सारखे आवश्यक अँटिऑक्सिडंट्स देखील असतात जे डोळ्याच्या रेटिनामध्ये जमा होतात आणि मोतीबिंदू आणि अंधत्व यासारख्या डोळ्यांच्या विकारांचा धोका लक्षणीयरीत्या कमी करतात. आपण उन्हाळ्यात अंडी खाऊ शकता परंतु सेवन दररोज 1-2 अंडींपेक्षा जास्त नसावे. तसेच तुमच्या आहारात भरपूर पाणी आणि फळे असली पाहिजेत.


अंडी गरम असतात त्यामुळे उन्हाळ्यात त्याचे सेवन टाळावे. परंतु ते पौष्टिकतेने इतके भरलेले आहेत की उन्हाळ्यात ते पूर्णपणे सोडून देण्यात अर्थ नाही. उन्हाळ्यात तुम्ही ते माफक प्रमाणात खाऊ शकतात. जस की दिवसाला कमीत कमी २ अंडी खाऊ शकता. कारण त्यापेक्षा जास्त अंडी खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होऊ शकते ज्यामुळे आतड्यांसंबंधी हालचालींमध्ये समस्या येऊ शकतात. शिवाय अंडी वजन कमी करण्यासही मदत करतात.

सकाळी अंडी खाल्ल्याने जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. परंतु आपण नैसर्गिकरित्या उन्हाळ्यात अन्न खाण्याची उच्च कमी असते त्यातच अंडी खाल्ल्याने अजून कमी होऊ शकते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img