नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) आणि बीआरएस नेत्या के कविता (K Kavita) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने (Delhi Court) या दोन्हीही नेत्यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसाची वाढ केली आहे. ईडी (ED) कडून अरविंद केजरीवाल आणि के कविता यांना दिल्ली दारू घोटाळ्याशी (Delhi Liquor Scam) संबंधित मनी लॉन्ड्री प्रकरणात अटक केली होती.
अरविंद केजरीवाल आणि के. कविता यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 7 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल आणि के. कविता यांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर आज कोर्टाने व्हिडीओ कॉन्फर्न्सिंगद्वारे सुनावणी केली. या सुनावणीदरम्यान ईडीने कोर्टाला लवकरच के. कविता प्रकरणाचे आरोपपत्र सादर करु असे सांगितले.
के कविता यांच्यानंतर ई़डीने अरविंद केजरीवाल आणि चरप्रीत सिंह यांच्या प्रकरणात देखील न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. त्यानंतर कोर्टाने आजच्या सुनावणीदरम्यान के. कविता, अरविंद केजरीवाल आणि चरप्रीत सिंह या तिन्ही प्रकरणात न्यायालयीन कोठडीत 7 मे पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला. या सर्वांना 7 मे रोजी दुपारी 2 वाजता कोर्टात हजर केले जाणार आहे.