26.6 C
New York

Congress Manifesto : काँग्रेस न्यायपत्राच्या एक हजार प्रती मोदींना पोस्टाने पाठवणार

Published:

रमेश औताडे/मुंबई

मोदी सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात काँग्रेसने रान पेटवले आहे. काँग्रेस सत्तेत आली तर सामान्य जनतेसाठी काय करणार आहे, याची माहिती असलेल्या ५० पानी पुस्तिकेच्या (Congress Manifesto) एक हजार प्रती पंतप्रधान कार्यालयाला (Prime Minister Office) पोस्टाने पाठवणार असल्याची माहिती मुंबई काँगेस मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष कचरू यादव यांनी दिली.

मंगळवारी दुपारी मुंबई विभागीय कार्यालयासमोर मागासवर्गीय सेलचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोदी सरकारच्या कारभारविरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी ५० पानी न्यायपत्राच्या प्रती दाखवत ‘राहुल गांधी संघर्ष करो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा दिल्या. वाढलेली महागाई, शिक्षण विभागाचा उडालेला फज्जा, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महिलांची असुरक्षितता, धर्माच्या नावाने सुरू असलेला प्रकार, पत्रकारांची मुस्कटदाबी, कामगार आंदोलने, डबघाईस आलेले उद्योग व काही मोजकेच भांडवलदार यांना दिलेली साथ, पर्यावरणाकडे होत असलेले दुर्लक्ष या व इतर महत्वाच्या मुद्यावर मोदी सरकारने देश कसा मागे नेऊन ठेवला आहे व काँग्रेसच्या न्याय पत्रात जनतेसाठी काय असेल, याचा लेखाजोखा या ५० पानी पुस्तिकेत मांडला आहे, असे कचरू यादव यांनी यावेळी सांगितले.

“सामान्य माणसाला न्याय देत असताना त्यांच्यावर अन्याय कसा होईल, यासाठी भाजप सरकारने काम केले आहे. पर्यावरण बिघडले असताना उन्हाचे चटके बसत आहेत आणि त्यात महागाईचे चटके बसू लागल्याने जनता होरपळून निघत आहे. राहुल गांधी यांनी देशभर पायी यात्रा काढत जनतेची मते जाणून घेतली
जनता त्रस्त झाली आहे. आगामी निवडणुकीत जनता भाजपला पाडल्याशिवाय राहणार नाही,” असे काचरू यादव यांनी यावेळी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img