3.7 C
New York

Chanky Pandey: मुलीच्या रिलेशनबाबत चंकी पांडेचं मोठं वक्तव्य…

Published:

बॉलीवूडमध्ये रोज नव्याने जोड्या बनतात आणि तुटत असतात. कित्येक सिनेरसिकांसाठी हा आवडीचा विषय ठरत असतो. अशातच बॉलीवूडचा नाईट मॅनेजर म्हणून ओळखला जाणारा आदित्य रॉय कपूर Aditya Roy Kapoor आणि अभिनेत्री अनन्या पांडे Ananya Pandey यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा अनेक दिवसापासून रंगत आहेत. अनेक पार्टीना, इव्हेन्टना दोघांना स्पॉट केले गेले आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेता व अनन्या पांडेचे वडील चंकी पांडे Chanky Pandey यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, माझी मुलगी अनन्या आता स्वतंत्र आणि मोठी झाली आहे, ती सध्या २५ वर्षांची आहे आणि माझ्यापेक्षा जास्त पैसे कमवते.

साहजिक ती तिच्या मनासारख वागू शकते. ‘माझ्या २५ वर्षांच्या मुलीला काय कर आणि काय करू नको ? हे सांगण्याची हिंमत मी कसा करू शकतो ?’असे चंकी म्हणाले. यानंतर त्यांना अनन्याच्या इंटिमेट सीन बद्दलदेखील विचारण्यात आले. अनन्याच्या चित्रपटांमध्ये केलेल्या इंटिमेट सीन्सबद्दल तुम्हाला काही अडचण आहे का? तर त्यावर चंकी पांडे ह्यांनी उत्तर दिले, नाही मला तिच्या इंटिमेट सीन्सबद्दलदेखील काही अडचण नाही.

मी हॉलिवूड चित्रपटांमध्ये ते सीन्स पहिले आहे आणि त्यात काही चुकीचे नाही. तुम्हालाही ते स्वीकारावे लागणार असे चंकी पांडे म्हणाले. चंकी पांडे ह्यांना दोन मुली आहेत दुसरी मुलगी अनन्यापेक्षा छोटी आहे. त्या दोघी तुमच्याकडे सल्ला घायला येतात का ? असे विचारल्यावर चंकी म्हणाले, की त्या जास्त आईच्या जवळ आहेत त्या प्रत्येक गोष्ट आईला सांगून आणि विचारून करतात आणि काय महत्वाचे काम असल्यास मला कॉल करतात. जेव्हा कधी त्यांना माझा सल्ला हवा असतो तेव्हा मी नेहमी हजर असतो.

अभिनेता चंकी पांडे त्यांच्या मुलींचे फार कौतुक करत होते. जेव्हा अनन्याला पहिला चित्रपट मिळाला तेव्हा मला तिचा खूप अभिमान वाटला आणि ह्यापुढेही वाटत राहील, असेदेखील त्यांनी नमूद केले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img