8.9 C
New York

Salman Khan : सलमान खान प्रकरणात मोठी अपडेट, पिस्तूल कुठे सापडले ?

Published:

मुंबई

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर झालेल्या गोळीबार (House Firing) प्रकरणात मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे अन्वेषण शाखेला (Crime Branch) मोठं यश मिळालंय. गुजरातमधील सूरत (Surat) येथे तापी नदीत (Tapi River) फेकलेले दुसरे पिस्तुलही पोलिसांनी हस्तगत केले आहे. पोलिसांकडून दोन दिवस तापी नदीत शोध मोहीम सुरू होती.

सलमान खान गोळीबार प्रकरणी तापी नदीतून दोन पिस्तूल, तीन मॅगझिन आणि 13 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. दोन दिवसांच्या सर्च ऑपरेशननंतर हत्यार शोधण्यात गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना यश आले. सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी देखील लॉरेंस बिश्नोई याचाच भाऊ अनमोल बिश्नोई याने घेतली. पोलिसांनी या गोळीबार प्रकरणातील हल्लेखोरांना अटकही केलीये.

नुकतेच या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. मुंबई गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरतमधील तापी नदीतून सलमान खानच्या घराबाहेर गोळीबारात वापरलेली एक पिस्तुल आणि काही काडतुसे जप्त केली आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी आज सकाळपासून तापी नदीमध्ये सर्च ऑपरेशन करत होते.

आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे सर्च ऑपरेशन सुरू होते. सलमान खानच्या घरावर फायरिंग केल्यानंतर आरोपी भुजला पळून गेले होते. मात्र, त्या अगोदर त्यांनी फायरिंगमध्ये वापरलेली बंदूक तापी नदीच्या पाण्यात टाकून दिली होती. जी मुंबई पोलिसांच्या हाती लागली आहे. आता या प्रकरणात अजूनही काही मोठे खुलासे होऊ शकतात.

हल्लेखोरांनी चाैकशीमध्ये खुलासा केला की, त्यांना सलमान खानच्या घरावर 10 राऊंड फायर करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतू दुचाकीवरून त्यांना 10 राऊंड फायर करणे शक्य झाले नाही. चाैकशीमध्ये अजून एक धक्कादायक माहिती पुढे आलीये, या हल्लेखोरांना गोळीबाराचे प्रशिक्षण देखील देण्यात आले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img