8.7 C
New York

Baramati LokSabha : शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे धाव; बारामतीत ‘तुतारी’ चिन्ह दोन उमेदवारांना

Published:

बारामती

लोकसभा निवडणुकीची (LokSabha Elections) रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर हातात दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल रोजी पार पडणार आहे. मात्र राज्यातील सर्वात हाय व्होल्टेज लढत असलेला बारामती लोकसभा (Baramati LokSabha) मतदारसंघात शरद पवार गटाचे (Sharad Pawar group) उमेदवार विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवार गटाच्या उमेदवार सुमित्रा पवार यांच्या लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फोट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला (Ajit Pawar group) देण्यात आले होते त्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूसच चिन्ह दिलं होतं. बारामती लोकसभा मतदारसंघात दोन उमेदवारांना तुतारी चिन्ह (election symbol) मिळाल्याने नवीन घोळ समोर आला असल्याने शरद पवार गटाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे (Election Commission) तक्रार करण्यात आली असून आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना नवे पक्ष चिन्ह देण्यात आले आहे. पण या चिन्हामुळे आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. बारामती लोकसभेत शरद पवार गटाच्या उमेदवार असलेल्या सुप्रिया सुळे यांचे निवडणूक चिन्ह तुतारी असून देखील अपक्ष उमेदवार सोयल शहा युनूस शहा शेख यांना निवडणूक आयोगाकडून तुतारी चिन्ह देण्यात आले आहे. ज्यावर आता शरद पवार गटाकडून आक्षेप घेण्यात आला असून त्यांनी याबाबतची निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

बारामती लोकसभेमध्ये तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच 07 मे ला मतदान होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघासाठी 12 ते 19 एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. या कालावधीत 51 जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. या अर्जांची छाननी 20 एप्रिल रोजी झाली. छाननीमध्ये पाच अर्ज बाद होऊन 46 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. यांतील आठ उमेगदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. यानंतर आता बारामती लोकसभेतून एकूण 38 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पण यांतील एका अपेक्षा उमेदवाराला तुतारी हे निवडणूक लढण्यासाठीचे चिन्ह देण्यात आल्याने आता बारामती लोकसभेत दोन उमेदवारी एकाच चिन्हावर म्हणजेच तुतारीच्या चिन्हावर लढणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चिन्ह हे ‘तुतारी फुंकणारा माणूस’ असे आहे. पण शेख यांना तुतारी हे चिन्ह देण्यात आले आहे. पण या चिन्हावरून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि ज्या कारणास्तव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून याबाबत आक्षेप नोंदविण्यात आल्याचे बोलले जात आहे. ज्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून याबाबत काय निर्णय घेण्यात येतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img