राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal rain) धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तर काही भागात उष्णतेची लाट आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासून हवामानात सातत्याने बदल होत आहे. आजही राज्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.आज प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
पुणे वेधशाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रातून वाफेचे उष्ण वारे किनाऱ्यावर येत असल्याने पुढील काही दिवस किनारपट्टी भागात तापमानात वाढ होणार आहे. आर्द्रता वाढल्यामुळे असह्य उष्ण हवामानाचा सामना करावा लागेल. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, आज, उद्या आणि 24 एप्रिल रोजी राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 23 आणि 25 एप्रिल रोजी कोकण आणि गोवा वगळता इतर राज्यात पावसाची शक्यता आहे. कोकणात आजपासून पुढील पाच दिवस उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. आज मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता आहे. मराठवाड्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहतील. आणि गारपिटीसह पावसाची शक्यता आहे.
मुंबई, कोकण किनारपट्टीच्या भागात उष्णतेच्या झळा बसणार आहे. अरबी समुद्रावरुन आर्द्रतायुक्त उष्ण वारे किनारपट्टीवर येत असल्याने 25 एप्रिलपर्यंत उकाडा जाणवणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस किनारपट्टीच्या भागात तापमान वाढणार आहे. आद्रता वाढल्यामुळे असह्य उकाडयाचा सामना करावा लागण्याचा अंदाज आहे. पश्चिमी थंड वाऱ्यांमुळे उत्तर भारतातील तापमानात घट झाली असून उत्तर कोकणात तापमानात काहीशी घट होईल. तर मुंबईपासून दक्षिणेकडे असणाऱ्या किनारपट्टीवर वाढत्या तापमान घट होण्याची शक्यता आहे. सध्या देशाला हवामानाच्या दुहेरी त्रासाला सामोरे जावे लागत आहे, उत्तर भारतात तीव्र उष्णता आणि उष्णतेची लाट आहे, तर डोंगराळ भागात बर्फवृष्टी आणि पावसामुळे जनजीवन कठीण झाले आहे आणि ही परिस्थिती केवळ भारतातच नाही तर संपूर्ण देशातही आहे. परदेशी देशांचा देखील आहे.
मुंबई आणि पुण्यात कसं असेल हवामान?
पुण्यात आज अंशत: ढगाळ राहून मेघ गर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस होईल. त्यानंतर दोन दिवस आकाश बहुतांशी निरभ्र राहील. मुंबईसह कोकण किनारपट्टीला पुन्हा एकदा तापमान वाढीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळं नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. अरबी समुद्रातून येणारे दमट उष्ण वारे किनाऱ्याकडे सरकणार असल्याने गुरुवार, 25 एप्रिलपर्यंत किनारपट्टीवर उष्णता जाणवेल.